Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

पंतप्रधान मोदी यांच्या विज्ञापनांवर गेल्या अडीच वर्षांत १ सहस्र १०० कोटी रुपयांचा खर्च !

जनतेचा पैसा अशा प्रकारे उधळणार्‍यांकडून तो व्याजासहित वसूल केला पाहिजे !
    नवी देहली - केंद्र सरकारने गेल्या अडीच वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समावेश असलेल्या विज्ञापनांवर १ सहस्र १०० कोटी रुपये खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये दूरचित्रवाहिनी, इंटरनेट, वृत्तवाहिन्यांवरील विज्ञापने यांचा समावेश आहे; मात्र वर्तमानपत्रातील विज्ञापने, फलक, पत्रके, पुस्तिका आणि दिनदर्शिकांवरील विज्ञापने यांचा समावेश नाही. माहितीच्या अधिकारातून ही माहिती मिळाली आहे. ग्रेटर नोयडामधील श्री. रामवीर सिंह यांनी या संदर्भात अर्ज प्रविष्ट केला होता.केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने १ जून २०१४ ते ३१ ऑगस्ट २०१६ या कालावधीतील विज्ञापनांच्या खर्चाचा तपशील दिला आहे.
१. १ जून २०१४ ते ३१ मार्च २०१५ या कालावधीत मोदी यांचा समावेश असणार्‍या विज्ञापनांवर ४४८ कोटी रुपये खर्च करण्यात आले.
२. १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१६ या कालावधीत मोदी यांचा समावेश असलेल्या विज्ञापनांवर ५४२ कोटी रुपये इतकी रक्कम खर्च करण्यात आली आहे.
३. १ एप्रिल २०१६ ते ३१ ऑगस्ट २०१६ या ५ महिन्यांच्या कालावधीत १२० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
४. माहिती अधिकारांतर्गत दाखल करण्यात आलेल्या या अर्जाद्वारे मन की बात या कार्यक्रमासाठी वर्तमानपत्रांमध्ये दिल्या जाणार्‍या विज्ञापनांसाठी २९ जुलै २०१५ पर्यंत ८ कोटी ५४ लाख ७४ सहस्र, ७८३ रुपये खर्च झाल्याची माहिती समोर आली होती. विशेष म्हणजे विज्ञापनांवरील खर्चाचा हा आकडा केवळ वर्तमानपत्रांमधील विज्ञापनांविषयीचा  होता. वृत्तवाहिन्या आणि इतर माध्यमातून करण्यात आलेल्या विज्ञापनांचा यामध्ये समावेश नव्हता.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn