Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कर्नाटकमध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या वृद्ध माजी सैनिकाला पोलिसाची मारहाण : पोलीस निलंबित

देशाचे रक्षण करणार्‍या सैनिकांशीही कसे वागायचे हे माहीत
नसणारे पोलीस सर्वसामान्यांशी कसे वागत असतील ?
     बागलकोट (कर्नाटक) - नोटाबंदीमुळे बँकांमध्ये होत असलेल्या गर्दीचा फटका येथील एका माजी सैनिकाला नुकताच बसला. बँकेत पैसे काढण्यासाठी गेलेल्या वृद्ध माजी सैनिकाला पोलिसाने मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या मारहाणीचे चित्रीकरण झाले आहे.
     नोटाबंदीच्या निर्णयाला ८ डिसेंबर या दिवशी एक मास पूर्ण झाला. असे असतांना अजूनही पैसे काढण्यासाठी बँकांच्या बाहेर लोकांच्या रांगा लागल्या आहेत. कर्नाटकमधील बागलकोटमध्येही बँकेच्या बाहेर गर्दी झाली होती. या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस ठेवण्यात आले आहेत. बँकेच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या गर्दीला मागे रेटतांना संतप्त पोलिसाने लोकांना मारण्यास चालू केले. त्यात त्याने एका वृद्ध माजी सैनिकाच्याही श्रीमुखात मारली. एवढेच नाही, तर त्याने त्या वृद्धाला रेटत मागे नेले. याचे चित्रीकरण झाल्यामुळे ही माहिती लगेच सगळीकडे पसरली. त्यामुळे पोलीस प्रशासनावर दबाव वाढला आणि शेवटी मारहाण करणार्‍या पोलिसाला निलंबित करण्यात आले. काही दिवसांपूर्वी पंजाबमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत निवृत्तीवेतन काढण्यासाठी गेेलेल्या एका ६५ वर्षीय माजी सैनिकाचा रांगेतच खाली कोसळून मृत्यू झाला होता.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn