Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सनबर्नची पार्श्‍वभूमी पडताळून कारवाई करू ! - गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांचे आश्‍वासन

श्री. दीपक केसरकर (उजवीकडे) यांना निवेदन देतांना श्री. अरविंद पानसरे
    नागपूर - मागील वर्षी गोवा येथे झालेल्या सनबर्न फेस्टिव्हलमध्ये अमली पदार्थविरोधी पथकाला त्या ठिकाणी शेकडो जण सार्वजनिकरित्या हुक्का आणि चिलीम पीत असतांना, तसेच अनेक जण तात्पुरत्या स्वरूपात बांधण्यात आलेल्या प्रसाधनगृहांत अमली पदार्थांचे सेवन करत असतांना पहायला मिळाले. सहस्रो जणांकडून नो स्मोकिंग झोनमध्ये धूम्रपान करण्यात येत होते. त्या वेळी पोलिसांनीही मोठ्या प्रमाणात दंड वसुली केली होती. सनबर्न फेस्टिव्हलच्या आयोजकांनी हा ड्रग्ज-फ्री इव्हेंट आहे, असे कितीही सांगितले, तरी या ठिकाणी अमली पदार्थांच्या सेवनाचा मुक्त संचार असतो, हा आतापर्यंतचा पोलीस आणि अंमली पदार्थविरोधी पथक यांचा अनुभव आहे. सनबर्न फेस्टिव्हलचे आयोजन देशाची सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी म्हणून नावलौकिक मिळवलेल्या पुण्यात होत आहे. पुण्याचे सांस्कृतिक वातावरण लक्षात घेता सनबर्नसारखे फेस्टीवल पुण्याच्या सुसंस्कृतपणाला गालबोट लावणारे ठरतील. यातून असे फेस्टिव्हल भरवून युवा पिढी वाममार्गाला लावणे म्हणजे, भारतीय संस्कृती नष्ट-भ्रष्ट करण्याचे कारस्थानच म्हणावे लागेल. राज्यशासनाने सांस्कृतिक अस्मिता जपावी, यासाठी सनबर्न फेस्टिव्हल रहित करावा, अशी मागणी करणारे निवेदन राज्याचे गृहराज्यमंत्री श्री. दीपक केसरकर यांना हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र प्रवक्ता श्री. अरविंद पानसरे यांनी दिले. त्यावर श्री. केसरकर यांनी सनबर्नची पार्श्‍वभूमी पडताळून कारवाई करू. त्याचसमवेत पोलिसांना त्या ठिकाणी अमली पदार्थांचा वापर केला जाणार नाही, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यास सांगू, असे आश्‍वासन दिले. या वेळी सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक हेही उपस्थित होते.
सनबर्नप्रकरणी लक्ष घालून योग्य ती कारवाई करू ! - पुण्याचे पालकमंत्री श्री. गिरीश बापट
      सनबर्न विषयीचे निवेदन सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी पुण्याचे भाजपचे पालकमंत्री श्री. गिरीश बापट यांना दिले. त्यावर श्री. बापट यांनी सांगितले की, मी सनबर्न प्रकरणात लक्ष घालून योग्य ती कारवाई करतो.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn