Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

    ठाणे / नेरूळ - आज सर्वधर्मसमभाव स्वीकारल्याने आपला कोण आणि परका कोण, हे हिंदूंना समजत नाही. मुंगूस ज्याप्रमाणे शत्रूला ओळखतो, ती मुंगूस वृत्ती हिंदूंमध्ये नाही. आज लव्ह जिहाद, जाळपोळ, बलात्कार, दंगली या माध्यमातून धर्मांध स्वत:चा धर्म वाढवत आहेत. या देशाला जर हिंदुस्थान म्हणून जगात रहायचे असेल, तर छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांविना गत्यंतर नाही, असे मार्गदर्शन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पू. संभाजी भिडे गुरुजी यांनी केले.
१७ डिसेंबर या दिवशी कुर्ला (प.) येथे आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. २८ विभागांतून आलेले ५०० धारकरी आणि शिवप्रेमी यांनी या व्याख्यानाचा लाभ घेतला. आरंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर ध्येयमंत्र म्हणून मार्गदर्शनाला प्रारंभ झाला. प्रेरणामंत्राने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाला आरंभ होण्यापूर्वी स्फूर्तीगीते म्हणण्यात आली.
     कोपरी, ठाणे (पू.) येथील धर्मवीर क्रीडा संकुल येथे झालेल्या मार्गदर्शनात १ सहस्र, तर नेरूळ (पू.) येथील इच्छापूर्ती श्री दत्त दिगंबर स्वामी मंदिर येथे झालेल्या मार्गदर्शनाला ४०० जणांची उपस्थिती होती.
पू. भिडे गुरुजी पुढे म्हणाले...
१. नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा उपयोग केवळ सत्तेसाठी आणि भ्रष्टाचाराने स्वत:चे काळे झालेले तोंड उजळ करण्यासाठीच केला जातो.
२. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभे करण्यासाठी महाराजांचा पदस्पर्श झाला आहे, अशी अनेक ठिकाणे असतांना ३ कोटी रुपये खर्चून समुद्रात दगड शोधण्यात आला.
३. नोटाबंदी आणि विकास यांद्वारे पंतप्रधान देशाच्या देहावर अलंकार चढवण्याचे काम करत आहेत; पण त्यात प्राणज्योत निर्माण करायची असेल, तर हिंदुत्वनिर्मितीच व्हायला हवी.
४. देशातील लोकांची वृत्ती, देशप्रेम आणि त्याग यांवर देश उभे रहातात. त्यामुळे आपले शत्रूराष्ट्र असलेल्या चीनच्या उत्पादनांवर सर्वांनी बहिष्कार घालायला हवा.
५. राष्ट्रीयत्वाची एक बाजू देशाप्रती क्रियाशील अभिमान आणि दुसरी बाजू आमचा देश आणि धर्म यांचा द्वेष करणार्‍यांचा संताप येणे ही आहे. सर्वांनी शिवचरित्राचे अध्ययन करायला हवे. शिवचरित्र न वाचणे म्हणजे महाराजांकडे पाठ फिरवण्यासारखेच आहे.
६. छत्रपती शिवाजी महाराज दैवत आहे, असे केवळ बोलून उपयोग नाही, तर ते काया-वाचा जागृतीत, सुषुप्तात अंत:करणात साठवायला हवेत.
क्षणचित्र - या वेळी गडकोट मोहिमेचे महत्त्व सांगतांना आणि मोहिमेला येण्याचे आवाहन करतांना पू. भिडेगुरुजी सद्गदित झाले होते. त्यांनी मी पदर पसरून तुम्हाला निमंत्रण देत आहे, असे सांगितले. काहीही न खाता-पिता त्यांनी ३ घंटे मार्गदर्शन केले.
गडकिल्ल्यांच्या रूपात उभे असलेल्या शिवरायांचा आशीर्वाद घेण्याचे आवाहन !
      गडकोट मोहिमेचे महत्त्व सांगतांना पू. भिडे गुरुजी म्हणाले, किल्ल्यांची माती कपाळी लावायलाच हवी. आपल्या देहात, पेशीपेशींत राष्ट्रीयत्व निर्माण करायला हवे. महाराजांचे सैन्य मूठभर असूनही गडकिल्ल्यांमुळे त्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले. गडकोट मोहिमेत सहभागी होऊन गडकिल्ल्यांच्या रूपात उभे असलेल्या शिवरायांचा आशीर्वाद घेण्यासाठी प्रत्येकाने यायला हवे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn