Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

माझ्यासाठी सर्वकाही प.पू. डॉक्टर !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले
कोणी पाहिला राम ।
कोणी पाहिला कृष्ण ॥
मला तर दिसले नाही कोणी ।
पण या डोळ्यांनी पाहिले ।
केवळ परम पूज्य, केवळ परम पूज्य ॥ १ ॥

ते म्हणाले, व्हा एकरूप कृष्णासी ।
अहो, पण कृष्ण आहे कोणाकडे ॥ 
ते म्हटले, जा मोक्षासी । 
हे खरे, पण मोक्ष आहे कोणाकडे ॥
ते म्हटले, करा भाववृद्धी । 
अहो, पण भाव आहे कोणाकडे ।
भाव निर्माण होणार कोणामुळे ॥
केवळ प.पू. डॉक्टर तुमच्यामुळे,
केवळ तुमच्याच कृपेमुळे ॥ २ ॥
     हे गुरुराया, तुम्हाला अपेक्षित अशी आर्तता आणि भक्तीभाव तुम्हीच आम्हा सर्व साधकांमध्ये निर्माण करा, कृपा करा ! 
- आधुनिक वैद्या (कु.) आरती तिवारी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.११.२०१५) या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. - संपादक
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn