Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

प.पू. पांडे महाराज यांच्या दिव्य सत्संगातून मिळालेल्या चैतन्यामुळे व्यष्टी आणि समष्टी साधना करण्यासाठी प्रेरणा मिळणे

प.पू. पांडे महाराज
श्री. शिवाजी वटकर
    माझ्या भाग्याने मला देवद आश्रमात प.पू. पांडे महाराज यांचा सत्संग मिळत आहे. त्याचा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर लाभ होत आहे. त्यांच्या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मला शिकायला मिळालेली सूत्रे येथे देत आहे.
१. प.पू. पांडे महाराजांना पहाटे
५.३० वाजता उत्साहात चालतांना पाहून

पहाटे उठून चालण्याची सवय लागणे आणि त्यामुळे शारीरिक दृष्टीने लाभ होणे
      मागील ९ मास (महिने) पहाटे ५.३० वाजता प.पू. पांडे महाराज यांच्यासमवेत चालण्याची मला संधी मिळत आहे. मला हृदयविकाराचा त्रास असल्यामुळे प्रतिदिन सकाळी चालण्याच्या व्यायामाची आवश्यकता आहेे. यापूर्वी माझ्याकडून सकाळी नित्यनेमाने चालणे होत नसे. प.पू. पांडे महाराज एवढे मोठे संत आणि ८९ वर्षे एवढ्या वयात ते नित्यनेमाने सकाळी उत्साहात आणि तरुणाला लाजवतील, अशा वेगाने चालतात. त्यामुळे मलाही पहाटे चालण्याची सवय लागली. असा मला शारीरिक दृष्टीने महाराजांमुळे लाभ होत आहे. अशा रीतीने आश्रमात राहिल्याने शरीरस्वाथ्याची काळजी प.पू. गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) घेत आहेत.
२. प.पू. पांडे महाराजांच्या सत्संगामुळे मन उत्साही,
प्रसन्न आणि सकारात्मक राहून दिवस आनंदात जाणे
      प.पू. पांडे महाराजांच्या सत्संगात असल्याने मन उत्साही आणि प्रसन्न असते. त्याचा दिवसभर चांगला परिणाम होतो. मन सकारात्मक राहून दिवस आनंदात जातो. मानसिक आधार मिळून निराशा येत नाही. मानसिक स्तरावर न रहाता आध्यात्मिक आणि भावाच्या स्तरावर रहाण्यास साहाय्य होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या दिव्य सत्संगाचा आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो.
३. प.पू. पांडे महाराजांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू परात्पर गुरु डॉ. आठवले
आणि सनातन संस्था असल्याने त्यांचे
सर्व बोलणे ज्ञानरूपी अन् चैतन्यमय असणे
      कलियुगात सर्वकाही मिळते; मात्र सत्संग मिळणे कठीण आहे. त्यातही प.पू. महाराजांसारख्या उच्च कोटीच्या संतांचा सत्संग आणि तोही ब्राह्ममुहुर्तावर मिळतो, हे माझे भाग्य आहे. त्यांच्या चैतन्यमय वाणीतून आलेले ज्ञानरूपी अमृत मला साधना करण्यासाठी प्रेरणा देते. त्यांनी आत्मीयतेने सांगितलेली साधनेविषयीची सूत्रे साधकांनी आचरणात आणली, तर जीवनाचे सार्थक निश्‍चित होईल. त्यांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सनातन संस्था असल्याने त्या अनुषंगाने त्यांचे सर्व बोलणे ज्ञानरूपी अन् चैतन्यमय असते.
३ अ. प.पू. पांडे महाराज यांनी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेविषयी केलेले मार्गदर्शन : गुरुकृपायोगानुसार साधनेतील स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेविषयी त्यांनी मला मार्गदर्शन केले. माझा दृष्टीकोन पालटून साधनेचे जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व समजले. परिणामी त्यांच्या आणि परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने मला ही प्रक्रिया आनंदाने करावीशी वाटून त्यातून आनंद मिळत आहे.
३ आ. भगवंताचे नियोजन समजून वागल्यास जीवनाचे सार्थक होणे आणि ईश्‍वराने आपल्यावर केलेल्या उपकाराची जाणीव ठेवून कृतज्ञताभावाने जीवन जगणे : भगवंताचे नियोजन समजून वागलो, तर जीवनाचे सार्थक होते. भगवंताचे नियोजन समजून कृती केली, तर आवरण अल्प होऊन चैतन्य ग्रहण करता येते. भगवंताने सूर्य, पृथ्वी, पर्वत, नद्या, पशू, पक्षी आदींची निर्मिती केली आहे. आपल्या शरिराचा अभ्यास केला, तर लक्षात येईल की, ईश्‍वराने पुष्कळ सूक्ष्म गोष्टींचा विचार करून आपल्याला सर्वकाही दिले आहे. त्याने आपल्यावर केलेल्या उपकाराची जाणीव ठेवून कृतज्ञताभावाने जीवन जगले पाहिजे.
३ इ. मृत्यूनंतर चित्रगुप्ताकडे जिवाला पाप-पुण्याचा हिशोब द्यावा लागणे म्हणजे जीवन संपल्यानंतरचा तो एक आढावा सत्संग असणे : ज्ञान आणि भक्तीयुक्त कर्म केले, तर ते यज्ञकर्म होते. भगवंताच्या नियोजनानुसार मृत्यूनंतर चित्रगुप्ताकडे आपल्याला पाप-पुण्याचा हिशोब द्यावा लागतो. जीवन संपल्यानंतरची तो एक आढावा सत्संग असतो. सर्वसाधारणपणे ८४ लक्ष योनींतून फिरून म्हणजे तितक्या वेळा आढावा सत्संग झाल्यावर आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त होतो.
३ ई. गुरुकृपायोगानुसार साधनेत स्वभावदोष आणि अहं-निर्मूलन प्रक्रिया महत्त्वाचा भाग असणे अन् साधकाला स्वतःच्या चुका, दोष लक्षात येत नसल्याने त्याचा शुद्धीकरण सत्संग घेण्यात येणे : परात्पर गुरु डॉ. आठवले हे साक्षात् भगवंतच आहेत. त्यांचे नियोजन समजून त्यानुसार साधना केली पाहिजे. त्यांनी गुरुकृपायोगानुसार साधना सांगितली आहे. त्यामध्ये स्वभावदोष आणि अहं-निर्मूलन प्रक्रिया हा महत्त्वाचा भाग आहे. त्या अंतर्गत सारणीमधे चुका लिहिणे, स्वयंसूचना घेणे, चुका सांगणे, फलकावर चुका लिहिणे, प्रायश्‍चित्त घेणे, इत्यादी गोष्टी येतात. साधकाला स्वतःच्या सर्व चुका आणि दोष लक्षात येत नाहीत. त्यासाठी आढावा सत्संग घेण्यात येतोे, यालाच शुद्धीकरण सत्संगही म्हणतात.
३ उ. व्यष्टी साधनेचा सत्संग म्हणजे कलियुगातील चित्रगुप्ताची सभा असणे आणि ८४ लक्ष योनींतून जाण्यापेक्षा पृथ्वीतलावर एकदाच हिशोब संपवून मोक्षप्राप्तीची संधी प्रत्येक साधकाला प.पू. गुरुदेवांच्या कृपेने मिळणे : शुद्धीकरण सत्संगात साधकाला त्याच्या चुका आणि स्वभावदोष यांची जाणीव करून देऊन त्यावर उपाय सांगितले जातात. साधकाला त्याच्यावरील त्रासदायक आवरणातील कोशातून बाहेर काढून त्याची दृष्टी पालटली जाते. त्याला सत्मार्गाला लावण्यात येते. हा व्यष्टी साधनेचा सत्संग म्हणजे कलियुगातील चित्रगुप्ताची सभाच आहे. पृथ्वीतलावर जिवंत असतांना आपल्याला पापक्षालन करण्याची सुवर्णसंधी या आढावा सत्संगामुळे मिळते. ८४ लक्ष योनींतून जाण्याऐवजी पृथ्वीतलावर एकदाच हिशोब संपवून मोक्षप्राप्तीची नामी संधी प्रत्येक साधकाला प.पू. गुरुदेवांच्या कृपेने मिळाली आहे.
३ ऊ. युद्धभूमीवर अर्जुन गर्भगळीत झाल्यावर श्रीकृष्णाने साधनेचे वेगवेगळे मार्ग सांगणे अन् त्याप्रमाणे सनातन संस्थेत स्वभावदोष आणि अहं-निर्मूलन प्रक्रिया राबवली जाणे : युद्धभूमीवर श्रीकृष्णाने अर्जुनाला जी गीता सांगितली, तो एक प्रकारचा आढावा सत्संग होता. त्याचेे दोष उफाळून येऊन तो गर्भगळित झाला होता. श्रीकृष्णाने त्याला लढण्यासाठी प्रेरित केले. तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धाविषयी मार्गदर्शन किंवा शिक्षण दिले नाही. त्याला साधनेचे वेगवेगळे मार्ग सांगितले. त्याप्रमाणेच सनातन संस्थेमध्ये व्यष्टी साधनेअंतर्गत स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवली जाते. यावरून प.पू. गुरुदेवांनी सध्याच्या कलियुगातील आपत्काळात सांगितलेल्या गुरुकृपायोगानुसार साधनेचे महत्त्व लक्षात येते.
४. गुरुकृपायोगानुसार साधनेत स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेमधे पापक्षालन करण्याची संधी मिळणे
      गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने जलद आध्यात्मिक उन्नती होते, याचा मी अनुभव आणि आनंद मिळवला आहे. माझी ६० टक्केहून अधिक आध्यात्मिक प्रगती झाली असून मी जन्म-मृत्यूच्या दुष्टचक्रातून बाहेर पडलो आहे, असे मला सांगितले गेले. हे नेमके कसे होते, हे माझ्या लक्षात येत नव्हते. मी पुष्कळ पाप केल्यामुळे मला ते भोगण्यासाठी अनंत जन्म घ्यावे लागणार आहेत, असे मला तोपर्यंत वाटत होते. गुरुकृपायोगानुसार साधनेत स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेमधे पापक्षालन करण्याची संधी मिळते.
५. प.पू. गुरुदेव यांच्या कृपेने या जन्माचे नाही, तर पुढील
अनेक जन्मांचे कल्याण होत
असल्याचे गुपित प.पू. पांडे महाराजांनी सांगणे
      राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यात ईश्‍वराला अपेक्षित सेवा करण्याची संधी मिळते. त्यामुळे याच जन्मात पाप-पुण्याचा बराचसा हिशोब पूर्ण होण्यास साहाय्य मिळत आहे. परिणामी जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून गुरुकृपायोग या साधनेच्या माध्यमातून प.पू. गुरुदेव साधकांना सोडवत आहेत. प.पू. गुरुदेव यांच्या कृपेमुळे या जन्माचे नाही, तर पुढील अनेक जन्मांचे माझे कल्याण होत आहे. याचे गुपित मला प.पू. पांडे महाराजांनी सांगितले. त्यामुळे व्यष्टी साधना करण्यास त्यांच्याकडून प्रेरणा मिळत आहे. याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यास माझ्याकडे शब्द नाहीत आणि माझी पात्रताही नाही. गुरुकृपायोगानुसार साधना करवून घेऊन शाश्‍वत आनंद देणार्‍या प.पू. पांडे महाराज आणि परात्पर गुरु डॉक्टर यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करतो.
- श्री. शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२१.८.२०१६)


धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn