Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

लोकलगाड्यांतील अवैध विज्ञापनांमध्ये ८० टक्क्यांनी घट !

      मुंबई, ९ डिसेंबर - लोकलगाड्यांतील डब्यांमध्ये अवैध भित्तीपत्रके लावणार्‍यांचे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी ८० टक्क्यांनी घटले असल्याची माहिती रेल्वे पोलीस दलाच्या अधिकार्‍यांनी दिली आहे. 
     अल्प श्रमात अधिक लोकांपर्यंत आपल्या आस्थापनाची, व्यवसायाची प्रसिद्धी करण्यासाठी काही जण रात्री लोकलगाड्या उभ्या असतांना गुपचूपपणे गाड्यांच्या डब्यात विनाअनुमती विज्ञापने चिकटवतात. यांमध्ये घरखरेदी, कर्जपुरवठा, नोकरीची संधी, भोंदू बाबा यांच्या विज्ञापनांचा प्रामुख्याने समावेश असतो. लोकलगाडीच्या डब्यांमध्ये ठिकठिकाणी चिकटवलेल्या या विज्ञापनांमुळे डबे विद्रुप दिसतात. (राष्ट्रीय संपत्तीचे विद्रुपीकरण करणारे राष्ट्रदोहीच ! संपादक) तसेच यांमुळे नागरिक फसवले जाण्याचीही मोठी शक्यता असते.
     रेल्वेच्या डब्यांमध्ये विनाअनुमती विज्ञापने चिकटवणार्‍यांच्या विरोधात मागील वर्षी रेल्वे सूरक्षा बलाने कडक मोहीम राबवली. लोकल रेल्वेगाड्यांमध्ये विनाअनुमती विज्ञापने लावणार्‍या १ सहस्र ९६६ जणांच्या विरोधात रेल्वे अधिनियम कलम ९६६ अंतर्गत कारवाई करण्यात आली. गाड्यांमध्ये लावण्यात आलेल्या विज्ञापनांच्या संख्येनुसार आस्थापनांकडून ५ ते २५ लक्ष रुपयांपर्यंत दंड आकारण्यात आला. लक्षावधी रुपयांचा दंड आकारला जात असल्याने विनाअनुमती विज्ञापने लावणार्‍यांवर चांगलाच चाप बसला आहे. परिणामी २०१६ या वर्षात विनाअनुमती विज्ञापने लावणार्‍या केवळ ३९३ जणांविरुद्ध गुन्ह्याची नोंद झाली आहे. ही घट मागील वर्षीच्या गुन्ह्यांच्या तुलनेत ८० टक्के एवढी आहे. (स्वसंपत्तीहून अधिक राष्ट्रीय संपत्तीची काळजी घेणारे नागरिक मिळण्याकरिता हिंदु राष्ट्रच हवे ! संपादक)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn