Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

जाज्वल्य इतिहासाचे स्मरण करून धर्मसेवेसाठी कार्यरत व्हा ! - प्रशांत जाधव, श्रीशिवप्रतिष्ठान

निगडी (तालुका सातारा) 
येथे हिंदु धर्मजागृती सभा 
श्री. प्रशांत जाधव
       सातारा, २१ डिसेंबर (वार्ता.) - हिंदूंनी आपल्या जाज्वल्य इतिहासाचे स्मरण करावे. श्रीशिवप्रतिष्ठानने चालू केलेल्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे. त्यातून प्रेरणा घेऊन धर्मसेवेसाठी कार्यरत व्हावे, असे प्रतिपादन श्रीशिवप्रतिष्ठानचे श्री. प्रशांत जाधव यांनी केले. ते निगडी येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर येथे २० डिसेंबरला आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत बोलत होते. या वेळी व्यासपिठावर हिंदु जनजागृती समितीच्या सौ. विद्या कदम आणि सनातन संस्थेचे श्री. राहुल कोल्हापुरे हेही उपस्थित होते.
       श्री. प्रशांत जाधव यांचा सत्कार श्री. विजय भालके, सौ. विद्या कदम यांचा सत्कार सौ. सीमा पवार आणिे श्री. राहुल कोल्हापुरे यांचा सत्कार श्री. शंकर पवार यांच्या हस्ते करण्यात आला. समितीचे श्री. हणमंत कदम यांनी समितीच्या कार्याचा आढावा सांगितला. सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन कु. प्रियांका साळुंखे यांनी केले. सभेला १०० हून अधिक धर्माभिमानी उपस्थित होते.
       धर्माभिमानी श्री. विक्रम पवार यांनी सभेसाठी ध्वनीक्षेपक यंत्रणा आणि विद्युतव्यवस्था दिली. या सभेस रणझुंजार मंडळ, धर्मवीर संभाजी महाराज मंडळ, जय मल्हार मंडळ, नवतरुण मंडळ यांचे सहकार्य लाभले.
       सभेनंतर प्रत्येक रविवारी सायंकाळी ७ वाजता विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याचे निश्‍चित करण्यात आले.
विविध क्षेत्रांमध्ये बळावलेल्या
दुष्प्रवृत्तींना आळा घालणे, हे धर्मपालनच ! 
- श्री. राहुल कोल्हापुरे, सनातन संस्था
       सध्या सर्व क्षेत्रांत भ्रष्टाचार बळावला आहे. शिक्षणव्यवस्था, सरकारीकरण झालेली मंदिरे, शासकीय कार्यालये ही भ्रष्टाचाराची कुरणेच झाली आहेत. धर्मशिक्षणाच्या अभावामुळे अनेक हिंदू धर्मांतराला बळी पडत आहेत. या सर्व समस्यांवर हिंदु राष्ट्र स्थापन करणे, हाच एकमेव उपाय आहे. हिंदु राष्ट्रात एकही भ्रष्टाचारी व्यक्ती नसेल. विविध क्षेत्रांमध्ये बळावलेल्या दुष्प्रवृत्तींना आळा घालणे, हे धर्मपालनच आहे.
हिंदूंनो, संकटांचा संघटितपणे प्रतिकार करा ! 
- सौ. विद्या कदम, हिंदु जनजागृती समिती
       कायद्याचा बडगा नेहमी हिंदूंवरच उगारला जात आहे. निधर्मी शासनव्यवस्थेमुळे हिंदूंना न्याय मिळत नाही. धर्मावरील संकटांचा हिंदूंनी संघटितपणे प्रतिकार केला पाहिजे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn