Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

‘गोमांस पौष्टिक भोजन आहे’, असे कुठे लिहिले आहे ? - पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालय

गोमांस खाण्याचे समर्थन करणार्‍या गोमांसप्रेमींना न्यायालयाने कठोर शिक्षा द्यावी, अशी हिंदूंची अपेक्षा !
   चंदीगड - ‘गोमांस पौष्टिक भोजन आहे’, असे कुठे लिहिले आहे ?, असा प्रश्‍न पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने एका याचिकाकर्त्याला विचारला. मागील वर्षी हरियाणा सरकारने ‘गायीचे संरक्षण आणि विकास अधिनियम सन २०१५’ हा कायदा लागू केला होता. या निर्णयाच्या विरोधात देहली येथील सी.आर्. जया सुकिन यांनी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. 
   या सुनावणीच्या वेळी याचिकाकर्त्याने ‘आवडीचे भोजन करणे प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. गोमांस पोष्टिक भोजन आहे. गोमांसावर बंदी घातल्याने नागरिकांच्या मुलभूत अधिकाराचे हनन होत आहे. त्यामुळे गोमांस खाण्यावर कोणतीही बंदी नसावी’, असे सांगितले. यावर न्यायालयाने याचिकाकर्त्यांना ‘गोमांस खाणेे पौष्टिक भोजन आहे’, असे लिहलेले कोणतेही साहित्य किंवा वैद्यकीय मत सादर करण्यास सांगितले. यासाठी न्यायालयाने पुष्कळ वेळ देऊनही याचिकाकर्त्याला त्याचा पुरावा देता आला नाही. (याचा अर्थ याचिकाकर्ता न्यायालयाला खोटी माहिती देत आहे, असे होत नाही का ? न्यायालयाने याविषयी सखोल चौकशी करून खोटी माहिती देऊन न्याययंत्रणेचा वेळ घेणार्‍या आणि न्यायालयाचा अवमान करणार्‍यांना शिक्षा सुनवावी, अशी हिंदूंची अपेक्षा आहे ! - संपादक)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn