Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

मला इसिसच्या आतंकवाद्यांबरोबर राहिल्यासारखे वाटले !

  मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केल्यानंतर उपरती झालेले
रा.स्व. संघाचे पद्मकुमार यांची माकपवर टीका आणि ‘घरवापसी’!
४० वर्षे संघात राहिल्यानंतरही माकपमध्ये प्रवेश करण्याचा विचार करणारे आणि प्रवेश केल्यावर माकपवर टीका करणारे पद्मकुमार यांना हे आधीच का समजले नाही कि धर्मशिक्षणाच्या अभावी त्यांचा गोंधळ उडाला ?
     थिरूवनंतपुरम् - ४ दशके राष्ट्रीय स्वयंसेवक संघात राहून नुकतेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात (माकप) प्रवेश केलेले थिरूवनंतपुरममधील नेते पी. पद्मकुमार यांनी पुन्हा संघात प्रवेश केला आहे. ‘माकपमध्ये इसिसच्या जिहादी आतंकवाद्यांमध्ये राहिल्यासारखे वाटले’, असे विधान पद्मकुमार यांनी केले आहे. माकपमध्ये प्रवेश करतांना पद्मकुमार यांनी संघावर आणि संघटेनेच्या कार्यशैलीवर टीका केली होती. तेथील अमानवी वागणूक, राजकारण आदींच्या विरोधात असल्याचे पद्मकुमार यांनी सांगितले होते. तसेच नुकत्याच घेण्यात आलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर संघातून बाहेर पडत असल्याचे त्यांनी सांगितले होते.      ‘हिंदू ऐक्य वेदी’चे पूर्व प्रांताचे सचिव पद्मकुमार यांनी २७ नोव्हेंबरला माकपमध्ये प्रवेश केला होता. संघाविषयी अप्रसन्नता व्यक्त करत त्यांनी माकपमध्ये प्रवेश केला होता; मात्र चार दिवसांतच त्यांनी घरवापसी केली. पुन्हा एकदा संघात प्रवेश करतांना त्यांनी माकपवर टीका केली. येथे युवा मोर्चाने आयोजित केलेल्या एका बैठकीत त्यांनी संघात परतण्याविषयी घोषणा केली.
     पद्मकुमार म्हणाले की, २७ नोव्हेंबरला झालेल्या पत्रकार परिषदेत माकपच्या नेत्यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात त्यांचे विचार नमूद केले नव्हते.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn