Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

हे राम नथुराम हे नाटक होणारच ! - शरद पोंक्षे आणि शिवसेना यांची ठाम भूमिका

        कोल्हापूर, १९ डिसेंबर - हे राम नथुराम या नाटकाचे आतापर्यंत ७०० प्रयोग झाले आहेत. आजपर्यंत या नाटकाला कोठेही विरोधी झालेला नाही. हे नाटक सेन्सॉरसंमत असून मला माझी भूमिका मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे हे राम नथुराम हे नाटक होणारच अशी ठाम भूमिका या नाटकातील नथुराम गोडसे यांची प्रमुख भूमिका करणारे अभिनेते श्री. शरद पोंक्षे यांनी घेतली. राजवाडा पोलीस ठाण्यात पोलीस, पुरोगामी, शिवसैनिक आणि हिंदुत्वनिष्ठ यांची संयुक्त बैठक आयोजित केली होती. त्या वेळी श्री. पोंक्षे यांनी त्यांची भूमिका मांडली. या वेळी शिवसेना, तसेच सर्वच हिंदुत्वनिष्ठ यांनी ते श्री. पोंक्षे यांच्या भूमिकेशी सहमती दर्शवत नाटकाच्या पूर्णपणे बाजूने असल्याचे सांगितले.
        १९ डिसेंबर या दिवशी केशवराव भोसले नाट्यगृहात रात्री ९ वाजता हे राम नथुराम या नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. याला विरोध दर्शवत संभाजी ब्रिगेड आणि पुरोगामी संघटना यांनी हे नाटक होऊ देणार नसल्याची भूमिका घेतली आहे. पोलिसांकडे चर्चा करतांना पुरोगामी संघटनांचे कार्यकर्ते म्हणाले, या नाटकाद्वारे तुम्ही नथुरामचे उदात्तीकरण करत आहात. आम्ही नाटक उधळून लावू, पोलिसांनीही नाटक सेन्सॉर संमत असल्याने ते होणारच, अशी भूमिका घेतली आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn