Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

आश्रम आणि सेवाकेंद्र यांसाठी लागणारे साहित्य अर्पण केल्यानंतर त्याविषयी विचारणा करणे, हे साधकांच्या साधनेच्या दृष्टीने चुकीचे !

पू. डॉ. चारुदत्त पिंगळे
    काही साधक आश्रम आणि सेवाकेंद्र यांसाठी लागणारे साहित्य अर्पण म्हणून देतात. या संदर्भात काही साधक पुढीलप्रमाणे विचारणा करतात - अर्पण म्हणून दिलेले साहित्य प्रत्यक्षात उपयोगात आणले जाते कि नाही ? किंवा त्यांनी एखाद्या विशिष्ट सेवाकेंद्र किंवा आश्रम यासाठी अर्पण दिले असेल, तर त्या साहित्याचा तेथेच उपयोग केला जातो कि अन्य कुठल्या आश्रमात केला जातोे ?
     अर्पण केलेल्या साहित्याविषयी साधकांनी पुढील गोष्ट लक्षात घ्यावी. सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचे एक प्रसिद्ध सुवचन आहे, एकदा काही अर्पण केले, तर त्यानंतर त्याविषयी आपल्या मनात कोणताही विचार येता कामा नये. त्यामुळे साधकांनीही आपण अर्पण केलेल्या साहित्याचे पुढे काय झाले ?, याचा विचार करणे किंवा त्यासंबंधी विचारणा करणे, हे साधनेच्या दृष्टीने चुकीचे आहे.     अर्पणाच्या माध्यमातून आपला त्याग होत असतो. त्यागाला साधनेत अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे एखाद्या सेवाकेंद्राला किंवा आश्रमाला आवश्यक साहित्य अर्पण दिल्यानंतर त्या माध्यमातून देवाने मला त्याग करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे, असा विचार होणे आवश्यक आहे. असा विचार झाला, तरच त्या अर्पणाच्या कृतीतून साधना होते. त्यामुळे अर्पण म्हणून देतांना आश्रम किंवा सेवाकेंद्रात काही देतांना ते साहित्य देणे अपेक्षित नसून, त्या साहित्याच्या माध्यमातून आपली साधना होणे देवाला अपेक्षित असते. हे लक्षात घेऊन साधकांनी अर्पणाकडे पहावे.
- पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, उत्तर भारत प्रसारसेवक (१६.१२.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn