Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

पोलिसांची कानउघाडणी !

गोवा राज्याचे पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर यांनी पोलिसांना सूचना देतांना म्हटले आहे की, वाईट कृत्यांत सापडल्यास कडक कारवाई केली जाईल. पोलिसांना अशी सूचना द्यावी लागली, यावरून पोलीस त्यांच्या कर्तव्याला योग्य प्रकारे जागत नसल्याचे सिद्ध होते. अर्थात् नियमाला अपवाद असतो; म्हणून सर्वच पोलिसांना या पद्धतीने दोष देणे अयोग्य ठरेल. स्वतःच्या कर्तव्याला जागणारे कतर्र्र्र्र्र्र्व्यदक्ष असे जसे काही पोलीस आहेत, तसेच स्वतःच्या पदाचा अपलाभ उठवत वैयक्तिक स्वार्थ साधणारे पोलीसही आहेत. जेवढे काही बेकायदा उद्योग आहेत, त्यांच्याशी अर्थलाभासाठी काही पोलिसांचे संबंध असतात. अशा काळ्या उद्योगांची मोठीच सूची असून तिच्याविषयी सविस्तर लिहायचे म्हणजे वेळेचा अपव्यय ठरेल. शिवाय या सर्व गोष्टी वाचकांना परिचित आहेतच. तात्पर्य असे की, पोलीस दलात शिरलेली ही वृत्ती समाजाला घातक आणि अन्यायकारी ठरत असल्याने त्यांच्या महासंचालकांना अशी चेतावणी द्यावी लागली. भ्रष्टाचार, स्वार्थ, उपभोग अशा दुष्प्रवृत्तींमुळे पोलीस पदावरील व्यक्ती टीकाकारांचे लक्ष्य बनतात. मुंबई शहरातील मरीन ड्राईव्ह आणि पवई परिसरातील बलात्काराची प्रकरणे, गोव्यातील दूधकेंद्रावरील दूध चोरीचे प्रकरण, भारत-पाक सीमेवरील अमलीपदार्थ तस्करी प्रकरण अशा काही ठळक गोष्टी आहेत, ज्याकडे पाहिले असता अपप्रवृत्तींकडे पोलीस व्यक्ती आकर्षित झालेली दिसते. गोवा हे पर्यटन व्यवसायासाठी प्रसिद्ध असलेले देशातील महत्त्वाचे राज्य. येथे येणार्‍या पर्यटकांमध्ये सर्व प्रकारचे म्हणजे गरीब-श्रीमंत, व्यसनी, भोगवादी, सत्शील, सदाचारी पर्यटक असतात. मद्यपान, अमलीपदार्थ सेवन, जुगार अशा प्रकारांना त्यामुळे वाव मिळतो. काही वर्षांपूर्वी पोलिसांच्या कह्यातील अमली पदार्थच ठेवलेल्या ठिकाणी नसल्याचे उघड झाले आणि त्यासंदर्भात एक पोलीस अधिकारी गुंतला असल्याचे उघड होऊन त्याच्यावर निलंबनाची आणि न्यायालयीन कारवाई झाल्याचे वृत्त होते. पोलीस गुंतले असल्याची अशी कित्येक उदाहरणे गोवा राज्यात उघड झाली. त्या त्या वेळी त्यांवर कारवाई झालीही; पण असे गैरप्रकार थांबले नाहीत. म्हणजेच होणार्‍या कारवाईची भीती पोलिसांतील काही जणांना वाटत नाही. याचा अर्थ नीतीमत्तेचा अभाव. अशी नीतीमत्ता धर्मशिक्षणातून निर्माण होत असते; पण हेच धर्मशिक्षण जनतेला दिले जाण्याची व्यवस्था आपल्या शिक्षण पद्धतीत नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. प्रथम आपण केले पाहिजे आणि नंतर जनतेला ते करायला सांगायला हवे. वाहतुकीचे कित्येक नियम आहेत. जनतेला ते पाळायला सांगतांना पोलिसांनी स्वतः आत्मपरिक्षण करायला हवे की, आपण ते नियम पाळतो का ? पोलीस महासंचालकांनी नोंद केल्याप्रमाणे मागील वर्षात ११ पोलिसांचा मृत्यू झाला. त्यापैकी काही मृत्यू वाहतूक नियम पाळून टाळता येण्यासारखे होते. स्वयंशिस्त न पाळण्याचे धैर्य पोलिसांना येते कुठून ? कर्तव्याला साजेशी वर्तणूक नसल्याचे दिसून आल्याने पोलीस महासंचालकांनी बेशिस्त पोलिसांवर कारवाई करण्याची चेतावणी दिली आहे. त्यांच्या या चेतावणीनंतर जनतेकडून त्यांचे अभिनंदनच होत आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn