Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

दोन्ही प्रकरणांतील दोषींवर कारवाईची शिफारस करणारे पत्र संबंधित मंत्र्यांना पाठवतो ! - महसूल राज्यमंत्री श्री. संजय राठोड

शाहूवाडी (कोल्हापूर) जमीन घोटाळा आणि श्री तुळजाभवानी देवस्थान दानपेटी घोटाळा प्रकरण
     नागपूर - पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अंतर्गत येणार्‍या कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी देवस्थानाची शाहूवाडी येथील १ सहस्र एकर शेतजमीन लाटण्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये देवस्थान समितीच्या सदस्यांच्या खोट्या स्वाक्षर्‍या आणि शिक्के मारून जमीन वळवण्याचा प्रयत्न झाल्याचे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडीच्या) चौकशीत उघड झाले आहे. त्या चौकशीत होणारा राजकीय हस्तक्षेप पूर्णपणे रोखणे, तसेच त्या प्रकरणी सादर झालेल्या अहवालावर शासनाकडून कोणती कार्यवाही करण्यात आली आणि दोषींवर लवकरात लवकर आरोपपत्र प्रविष्ट करावे. त्याचसमावेत श्री तुळजाभवानी देवस्थानमधील दानपेटी घोटाळ्याचा राज्य अन्वेषण विभागाचा (सीआयडी) चौकशी अहवाल त्वरित उघड करून सर्व दोषी व्यक्तींवर कठोर करावी, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र प्रवक्ता श्री. अरविंद पानसरे यांनी महसूल राज्यमंत्री श्री. संजय राठोड यांना दिले. त्यावर श्री. राठोड यांनी सांगितले की, शाहूवाडी जमीन घोटाळा आणि श्री तुळजाभवानी देवस्थानचा दानपेटी घोटाळा या दोन्ही प्रकरणातील दोषींवर कारवाईची शिफारस करणारे पत्र संबंधित मंत्र्यांना पाठवतो.
     या प्रसंगी समितीचे श्री. श्रीकांत पिसोळकर हेही उपस्थित होते. या वेळी श्री. राठोड यांना सनातन पंचांग २०१७ भेट म्हणून देण्यात आले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn