Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

साधकांना आईचे प्रेम देऊन त्यांची साधना होण्यासाठी सतत प्रयत्न करणार्‍या आणि नेहमी देहभान हरपून भावपूर्ण सेवा करणार्‍या ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. सोनल जोशी !

कु. सोनल जोशी
१. प्रत्येक वस्तू स्वच्छ, व्यवस्थित आणि नीटनेटकी ठेवणे
     ‘कु. सोनल जोशी (ताई) शांत आणि स्थिर असते. तिची प्रत्येक वस्तू स्वच्छ आणि नीटनेटकी असते. ताई कपड्यांच्या घड्याही व्यवस्थित घालते. त्यामुळे तिचे कपडे इस्त्री केल्यासारखे वाटतात आणि अधिक काळ टिकतात. 
२. सहसाधकांना आईप्रमाणे आधार वाटणे
    सहसाधकांना सोनलताई आईसमान वाटते. त्यामुळे सर्व साधिका तिला विचारून आणि दाखवूनच नवीन कपडे, दागिने वा वस्तू खरेदी करतात. कधी प्रदर्शन आणि विक्रीच्या ठिकाणी तिला काही पोशाख पाहिल्यावर वाटले की, हा पोशाख या साधिकेला चांगला दिसेल, तर ती लगेच त्या साधिकेसाठी त्याविषयी सांगते. तेव्हा ‘तिच्या म्हणण्याप्रमाणे व्हायला पाहिजे’, असा तिचा आग्रह नसतो.
      तिच्यातील प्रेमभावामुळे मला तिच्याशी बोलल्यावर ‘प.पू. डॉक्टरांना आत्मनिवेदन केले आहे’, असे जाणवून आनंद मिळतो आणि ताईचा आधारही वाटतो. त्यामुळे ताईला हाक मारतांना माझ्याकडून आपोआप ‘आई’ असे म्हटले जाते. 
३. सोनलताईने सत्संगात चुका सांगितल्यामुळे निराशा येणे आणि तिने प्रेमाने मिठीत घेऊन
डोक्यावर हात ठेवताच मनातील नकारात्मक विचार दूर होऊन साधना करण्याचा उत्साह वाढणे
     सोनलताई सत्संगात साधकांना चुका सांगून साधनेविषयी मार्गदर्शन करते. तिच्यात देवाप्रती असलेल्या भावामुळे ती हे करत असते. यामागे ‘साधकाला साहाय्य होऊन तो साधनेत पुढे जायला पाहिजे’, अशी तिची तळमळ असते. एकदा सत्संगात मला माझे स्वभावदोष सांगितल्यावर माझा अहं दुखावला गेला आणि मला वाईट वाटले. सत्संग झाल्यानंतर ताईने मला तिच्या मिठीत घेतले आणि ती मला म्हणाली, ‘‘अगं, असे वाईट वाटून घ्यायचे नाही. प्रयत्न कर.’’ तिने असे म्हणून माझ्या डोक्यावर हात ठेवला. तेव्हा मला वाटले, ‘जणूकाही प.पू. डॉक्टरांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आहे.’ ताईने हात ठेवल्यावर माझ्या मनातील अयोग्य विचार दूर होऊन स्वभावदोष निर्मूलनासाठी प्रयत्न करण्याचा माझा उत्साह वाढला आणि नंतर मला हलके वाटून आनंद जाणवला. 
४. सोनलताईसमवेत सेवा करतांना शिकायला मिळालेली सूत्रे 
४ अ. नवीन साधकाला सेवा शिकवतांना त्याच्याकडून सेवा परिपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करणे
      ताईला अनेक सेवा येतात. ताईची सूक्ष्मातील जाणण्याची क्षमताही चांगली आहे. तिला विविध सेवा आणि त्यांमधील बारकावे ठाऊक आहेत. या सेवा शिकवतांना ताई प्रथम ‘साधकांना कोणते बारकावे लक्षात येतात ?’, हे बघते. नंतर साधकांना उर्वरित बारकावे सांगते. सेवा नव्याने शिकणार्‍या साधकाला सांगतांना ‘त्याला सेवेतील बारकावे लक्षात येऊन त्याच्याकडून सेवा परिपूर्ण व्हावी’, असा तिचा उद्देश असतो.
४ आ. सोनलताईने ‘प्रत्येक सेवा करतांना मनापासून प्रार्थना करून 
देवाचीच सेवा करत असल्याचा भाव कसा ठेवावा’, ते स्वतःच्या कृतीतून शिकवणे
      वैशिष्ट्यपूर्ण वस्तूंचे प्रदर्शन लावायचे असल्यास ताई चांगले नियोजन करते. आधुनिक वैद्यांनी तिला कटी आणि पाय दुखण्याचा त्रास असल्याने ‘खाली वाकू नका’, असे सांगितले आहे, तरीही ताई ‘वस्तू ठेवायला पटल आणून ते पुसणे, त्यावर व्यवस्थित चादर घालणे, प्रदर्शनात वस्तूंची व्यवस्थित रचना करणे, प्रदर्शन पूर्ण लावून झाल्यानंतर खोके जागेवर ठेवणे’ इत्यादी सेवा दायित्व घेऊन पूर्ण करते. ताई सेवा केल्यानंतरही उत्साही असते; याउलट मी सेवा केल्यानंतर थकते. या संदर्भात एकदा मी ताईला म्हणाले, ‘‘ताई, माझ्यापेक्षा तूच अधिक सेवा करतेस; पण तू कधीच थकत नाहीस. सतत आनंदी आणि उत्साही असतेस.’’ त्यावर ती म्हणाली, ‘‘देवाचीच सेवा करत आहे’, असा भाव ठेवायचा आणि सेवा करण्याआधी देवाला सांगायचे, ‘देवा, ही सेवा करतांना मला तुझे चैतन्य मिळू दे. मला तुझी शक्ती ग्रहण करता येऊ दे. माझे लक्ष नामावर अखंड असू दे.’’ ताई हे सर्व नम्रपणे सांगत होती. तिच्या बोलण्यातून कधीच अहं जाणवत नाही. 
४ इ. रुग्णाईत असतांनाही दुखण्याकडे दुर्लक्ष करून सेवारत आणि भावस्थितीत रहाणे
      ताई प्रकृती बरी नसतांनाही सेवारत असते. एकदा ताईला ताप आला होता आणि सर्दीही झाली होती. तेव्हा ताई झोपून भ्रमणभाषद्वारे साधकांशी साधनेविषयी बोलत होती. तिची प्रकृती बरी नसतांना तिला ‘लघुसंदेश पाठवायचे नाहीत किंवा जिना चढ-उतार करायचा नाही’, असे सांगितले होते. ताईला दिवसभरात सेवेनिमित्त अनेक वेळा जिन्यावरून वर-खाली करायला लागले, तरीही ती कधीच ‘माझे काहीतरी दुखत आहे’, असे म्हणत नव्हती. ताई नेहमी दुखण्याकडे दुर्लक्ष करून सेवारत आणि भावस्थितीत असते.
५. संतांनी काढलेलेे कौतुकोद्गार 
५ अ. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ
     सोनलताई सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना साधनेसंबंधी आढावा लिहून देते. एकदा सद्गुरु बिंदाताई म्हणाल्या, ‘‘सोनलने लिहिलेला कागद मला टाकावासा वाटत नाही. किती सुंदर आणि व्यवस्थित आढावा दिला आहे !’’ 
५ आ. पू. संदीप आळशी
     एकदा मी पू. संदीप आळशी (पू. दादा) यांना सांगितले, ‘‘सोनलताईने मला योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी तुमच्याशी बोलायला सांगितले आहे.’’ तेव्हा पू. दादा म्हणाले, ‘‘तीही तुला योग्य मार्गदर्शन करू शकते. ती चांगली आहे.’’
६. कृतज्ञता आणि प्रार्थना 
     देवा, तुझ्या कृपेमुळे हे सर्व शिकता आले. त्यासाठी मी कृतज्ञ आहे. देवा, सोनलताईमधील गुण माझ्यात येण्यासाठी माझ्याकडून प्रयत्न होऊ दे’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.’ 
- कु. श्रावणी पेठकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.८.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn