Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

अंनिसवर कारवाई करण्यासाठी विधी आणि न्याय विभागाच्या राज्यमंत्र्यांकडे शिफारस करणार ! - गिरीश महाजन, जलसंपदामंत्री

   
जलसंपदामंत्री श्री. गिरीश महाजन (उजवीकडे) यांना
सनातन पंचांग भेट देतांना श्री. अरविंद पानसरे
   नागपूर, ७ डिसेंबर (वार्ता.) - अंनिसच्या आर्थिक घोटाळ्याच्या संबंधाने त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी विधी आणि न्याय विभागाच्या राज्यमंत्र्यांकडे शिफारस करू, असे आश्‍वासन जलसंपदामंत्री तथा भाजपचे नेते श्री. गिरीश महाजन यांनी दिले. हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र प्रवक्ता श्री. अरविंद पानसरे यांनी श्री. महाजन यांची भेट घेतली. या प्रसंगी त्यांना वरील विषयावर निवेदन देण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
  अंनिसकडून देशविदेशांतून कोट्यवधी रुपये जमा करून मोठा आर्थिक घोटाळा करण्यात आला आहे. या संस्थेने शासनाचे लाखो रुपयांचे अंशदान (कर) बुडवले आहे. विदेशातून घेतलेले पैसे वार्षिक हिशोब पत्रकात दाखवण्यात आलेले नाहीत. देणगी पावत्यांवर क्रमांक नाहीत, असे अनेक अपप्रकार आणि कायदाद्रोही कृत्ये अंनिस न्यासाने केलेली आहेत. तसेच निरीक्षक आणि अधीक्षक, सार्वजनिक विश्‍वस्त न्यास कार्यालय, सातारा या विभागाने सदर न्यासावर प्रशासन नेमून विशेष लेखापरीक्षण करण्याची शिफारस केली आहे; मात्र साहाय्यक धर्मादाय आयुक्त, सातारा विभाग हा अहवाल तसाच प्रलंबित ठेवून दोषींना पाठीशी घालत आहेत. 
त्यामुळे त्या अहवालावर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने जलसंपदामंत्री श्री. गिरीश महाजन यांच्याकडे या वेळी केली. या वेळी श्री. पानसरे यांनी श्री. महाजन यांना सनातन पंचांग २०१७ भेट दिले.
भुसावळ येथे छत्रपतींचा पुतळा उभारण्यास होणार्‍या दिरंगाईकडेही लक्ष वेधले !
   भुसावळ येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी गेली १९ वर्षे तेथील स्थानिक हिंदुत्ववादी मागणी आणि त्यासाठी पाठपुरावा करत आहेत. असे असतांना तेथील पोलीस प्रशासन पुतळा उभारण्यासाठी अनुमती देत नाही. त्यामुळे या प्रकरणी लक्ष घालण्यासाठीचे निवेदनही श्री. गिरीश महाजन यांना देण्यात आले. त्यावर श्री. महाजन यांनी जळगावच्या जिल्हाधिकार्‍यांना या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगतो, असे सांगितले. 
अंनिसची आर्थिक घोटाळ्यासंबंधाने चौकशी करण्यासाठी
मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवतो !
- श्री. विष्णु सवरा, आदिवासी विकासमंत्री
डावीकडून श्री. भूषण कुलकर्णी, श्री. अरविंद पानसरे
 हे श्री. विष्णू सावरा यांना निवेदन देतांना
   अंनिसच्या आर्थिक घोटाळ्यासंबंधी चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना शिफारस पत्र पाठवतो. त्याचसमवेत देवस्थानांचा कारभार पहाणारे सर्व शासकीय अधिकारी, तसेच जिल्हा वा सत्र न्यायाधीश यांना माहिती अधिकाराच्या कक्षेत आणून त्यांना मार्गदर्शक तत्त्वे घालून देण्याविषयीही संबंधित मंत्र्यांना तशी शिफारस पत्रे पाठवतो, असे आश्‍वासन आदिवासी विकासमंत्री तथा भाजपचे नेते श्री. विष्णु सवरा यांनी दिले. हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ता श्री. अरविंद पानसरे आणि दैनिक सनातन प्रभातचे वार्ताहर श्री. भूषण कुलकर्णी यांनी श्री. सवरा यांची वरील विषयांच्या अनुषंगाने भेट घेतली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी श्री. सवरा यांना सनातन पंचांग २०१७ भेट देण्यात आले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn