Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

पुणे येथील संत प.पू. आबा उपाध्ये आणि त्यांच्या पत्नी पू. सौ. मंगला उपाध्ये यांनी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या वाढदिवसानिमित्त दिलेले आशीर्वाद !


प.पू. आबा उपाध्ये आणि पू. (सौ.) मंगला उपाध्ये
योगायोग शुभयोग !
 ॥ श्री ॥
     आपले गुरु सद्गुरु सदानंद महाराज बसवकल्याण (कर्नाटक) यांच्या वाणीमध्ये ते म्हणाले होते, ‘‘कुठलाही योग हा परमेश्‍वराने नियतीमध्ये ठरवून ठेवलेला असतो आणि तो यावा लागतो.’’ तसाच योग माझ्यासमोर दोन दिवसांपूर्वी येऊन उभा राहिला. तो म्हणजे ‘शुभयोग !’ दोन दिवसांपूर्वी मी सद्गुरु (सौ.) अंजलीताई गाडगीळ यांना भ्रमणभाष केला होता. (सद्गुरु अंजलीताईंना मी उगीच त्रास देत नाही; कारण त्यांच्यामागे असलेली भरपूर कामे त्यांना पार पाडायची असतात.) संध्याकाळी त्यांचा भ्रमणभाष आला. ‘‘आबा नमस्कार !’’ तेच गोड शब्द आणि भरलेली प्रेमाची आर्तता ! ‘‘मला आशीर्वाद द्या !’’ 

     मी म्हणालो, ‘‘भगवंताकडून ‘सद्गुरु’चा पुरस्कार मिळालेल्या सौ. अंजलीताई, तुम्हाला मी काय आशीर्वाद देणार ? आशीर्वाद देणे, हा भगवंताचा अधिकार आहे. मी केवळ सदिच्छा देणार.’’ त्या म्हणाल्या, ‘‘हरकत नाही. मी तो आशीर्वाद समजेन.’’ त्या म्हणाल्या, ‘‘तुमचा भ्रमणभाष आला; म्हणून मी तुम्हाला सांगते, माझा १३.१२.२०१६ या दिवशी वाढदिवस आहे. तेव्हा मी सकाळी तुम्हाला नमस्कारासाठी भ्रमणभाष करीन.’’ ‘या संवादावरून मला काय वाटले ?’, ते पुढीलप्रमाणे आहे. 
     किती जन्मांच्या पुण्याईचा हा साठा असावा; कारण यंदाच्या वर्षी सद्गुरु (सौ.) अंजलीताई यांचा वाढदिवस दत्तजयंतीच्या दिवशी आला आहे. त्यांच्या वाढदिवसाची तिथी चतुर्दशी असून ती सोमवारी होती. (चतुर्दशी सोमवारी सायंकाळी प्रारंभ होणार होती.) सोमवार हा भगवान शंकराचा दिवस ! म्हणजेच एक प्रकारे सद्गुरु (सौ.) अंजलीताईंवर भगवान शंकरांनी १०० वर्षांच्या आशीर्वादाचा वर्षावच केला आहे. हा शुभयोग जमून आला, हा आमचा शुभयोग ! 
     तेव्हा (सौ.) अंजलीताई तुम्हाला मी, माझी पत्नी आणि आमचे कुटुंबीय यांच्या वतीने सद्गुरु सदानंद स्वामी अन् शिव यांच्या चरणी एकच प्रार्थना करतो, ‘तुम्हाला आयुरारोग्य, मनःस्वास्थ्य, मनःशांती आणि ब्रह्मानंद मिळो, ही इच्छा !’ त्याचप्रमाणे ‘आपले गुरु परम पूज्य डॉ. जयंतराव आठवले आणि आपल्या भगिनी सद्गुरु (सौ.) बिंदाताई हेही आपणांस दिलेल्या आशीर्वादात सहभागी आहेत’, असे वाटते. 
     जय सनातन संस्था आणि जय अखंड हिंदुस्थान ! ते होणारच, होणारच, होणारच !! 
 - आपले स्नेहांकित, 
श्री. आबा उपाध्ये, सौ. मंगला उपाध्ये आणि कुटुंबीय. (१०.१२.२०१६, सकाळी १०.१८) 
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn