Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या स्टॉलची डाव्या संघटनेच्या सांस्कृतिक समूहाकडून तोडफोड

ही आहे डाव्यांच्या सांस्कृतिक समूहाची चालू असलेली विकृती !
आता असहिष्णु कोण आहे, हे जनतेनेच सांगावे !
      मुंबई - येथे डाव्या संघटनेच्या सांस्कृतिक समूहाकडून ६ डिसेंबर या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाणदिनानिमित्त ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, मुंबई’च्या वतीने लावण्यात आलेल्या स्टॉलची तोडफोड करण्यात आली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोकण प्रांताच्या विद्यापिठ कार्यप्रमुखांनी ही माहिती दिली. ते पुढे म्हणाले, ‘‘स्टॉलवर बुद्ध आणि कार्ल मार्क्स तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर उवाच या पुस्तकांच्या प्रती विनामूल्य वितरणासाठी अन् विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. या पुस्तकांतील काही मजकुरावर आक्षेप असल्याचे कारण देऊन त्यांनी स्टॉलची नासधूस केली, तसेच कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली. या वेळी त्यांनी बाबासाहेबांचे चित्र असलेला फ्लेक्स फलक फाडण्याचा प्रयत्न केला. पुस्तकाविषयी काही तक्रार असल्यास कायदेशीर तक्रार करा, असे सांगूनही त्यांनी तोडफोड करणे चालूच ठेवले.’’धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn