Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

हिंदूंनी मोठ्या संख्येने हिंदु धर्मजागृती सभेत सहभागी व्हावे ! - संभाजीराव भोकरे, शिवसेना

कोल्हापूर येथे पत्रकार परिषद 
डावीकडून श्री. मधुकर नाझरे, डॉ. (सौ.) शिल्पा कोठावळे, श्री. मनोज खाडये, 
डॉ. मानसिंग शिंदे, बोलतांना श्री. संभाजीराव भोकरे, श्री. शिवाजीराव ससे
कोल्हापूर, ७ डिसेंबर (वार्ता.) - हिंदूंचे संघटन होण्याच्या दृष्टीने ही सभा अत्यंत महत्त्वाची आहे. या सभेच्या प्रचारात शिवसैनिक सर्वत्र सहभागी आहेत. या सभेत सहभागी होणे, हे धर्मकर्तव्यच असल्याने हिंदूंनी मोठ्या संख्येने ११ डिसेंबर या दिवशी होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेत सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे यांनी केले. ते धर्मजागृती सभेच्या निमित्ताने राजर्षी शाहू स्मारक येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी शिवसेनेचे मुरुगुड येथील विभागप्रमुख श्री. मारुती पुरीबुवा, हिंदु एकता आंदोलनाचे श्री. शिवाजीराव ससे, श्री संप्रदायाचे शहरप्रमुख श्री. एम्.के. यादव, श्रीशिवप्रतिष्ठानचे सर्वश्री शरद माळी, आशिष लोखंडे, हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. मनोज खाडये, रणरागिणी शाखेच्या डॉ. (सौ.) शिल्पा कोठावळे, सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे उपस्थित होते. 
अन्य मान्यवरांनी व्यक्त केलेली मते....
  • श्री. एम्.के यादव - सभेला श्री संप्रदायाचा पूर्ण पाठिंबा आहे. गेले महिनाभर आमचा या सभेच्या प्रचारात सहभाग आहे. आमच्या प्रत्येक साप्ताहिक सत्संगात आम्ही हा विषय मांडला आहे. हिंदु धर्माचा प्रचार करणे, हेच आमचे ध्येय आहे. त्यामुळे आमचे साधक मोठ्या संख्येने या सभेसाठी उपस्थित रहाणार आहेत. 
  • डॉ. (सौ.) शिल्पा कोठावळे - ग्रामीण आणि शहरी भागातूनही महिलांचा सभेसाठी प्रतिसाद वाढत आहे. त्यामुळे या सभेसाठी महिला आणि युवती मोठ्या संख्येने उपस्थित रहातील, असा आम्हाला विश्‍वास वाटतो. 
  • श्री. मनोज खाडये - सभेत भाग्यनगर येथील श्रीराम युवासेनेचे अध्यक्ष आणि भाजपचे आमदार श्री. राजासिंह ठाकूर, तसेच हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांचे जाज्ज्वल्य विचार ऐकण्याची संधी मिळणार आहे. आमदार श्री. राजासिंह ठाकूर हे प्रखर हिंदुत्वनिष्ठ असून ते पश्‍चिम महाराष्ट्रात प्रथमच येत आहेत. त्यामुळे युवकांमध्ये त्यांच्याप्रती आकर्षण आहे.
९ डिसेंबरला वाहनफेरी ! 
सभेच्या प्रचारासाठी ९ डिसेंबर या दिवशी वाहनफेरी काढण्यात येणार आहे. फेरीचा प्रारंभ सकाळी १०.३० वाजता धर्मध्वजाचे पूजन करून मिरजकर तिकटी येथून होईल. ही फेरी महाद्वार चौक, महापालिका, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, राजारामपुरी मुख्य रस्ता, बिंदू चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गंगावेस, रंकाळा बसस्थानकापासून मिरजकर तिकटी येथे सभेची समाप्ती होईल. फेरीसाठी हिंदूंनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
आज पुरोगामी संघटना या हिंदूंचे सण, परंपरा यांच्यावर सातत्याने टीका करतात. हिंदूंच्या प्रथांना जुनाट प्रथा म्हणून हिणवले जाते. सामाजिक संकेस्थळावरूनही सातत्याने पुष्कळ टीका केली जाते. त्यामुळे हिंदु धर्मबांधवांना वस्तूस्थिती समजावी आणि त्यांच्यावर हिंदु धर्माचे महत्त्व बिंवावे, हा उद्देशही सभेच्या माध्यमातून साध्य होणार आहे, असे श्री. मनोज खाडये यांनी एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देतांना सांगितले.
पू. भिडेगुरुजी यांना सभेचे निमंत्रण !
मिरज - येथे विद्यामंदिर प्रशालेच्या मैदानात श्रीशिवप्रतिष्ठानचा कार्यक्रम झाल्यानंतर हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी पू. भिडेगुरुजी यांना कोल्हापूर येथे ११ डिसेंबर या दिवशी होणार्‍या सभेचे निमंत्रण दिले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn