Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

विधानसभेत आमदारांनी मांडलेल्या औचित्याच्या सूत्रावर उत्तर न देणार्‍या संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई होणार !

    नागपूर, १९ नोव्हेंबर (वार्ता.) - विधानसभेत सर्वपक्षीय आमदार विविध विषयांवर औचित्याचे सूत्र मांडतात; मात्र हे सूत्र मांडल्यानंतर विधिमंडळ अधिनियमाप्रमाणे विविध खात्यांतील सचिव आणि संबंधित अधिकारी यांना १ मासात उत्तर देणे आवश्यक असते. असे असतांना औचित्याच्या सूत्राकडे अधिकार्‍यांकडून दुर्लक्ष केले जाते. परिणामी आमदारांनी त्यांच्या विषयांची उत्तरे मिळत नाहीत. त्यामुळे या विषयाची गंभीर नोंद घेऊन औचित्याच्या सूत्रावर उत्तर न देणारे मंत्र्यांचे सचिव आणि संबंधित अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी १७ डिसेंबर या दिवशी विधानसभेत सर्वपक्षीय आमदारांनी एकमताने केली.      संसदीय कामकाज मंत्री श्री. गिरीश बापट म्हणाले की, विधानसभेत औचित्याचे सूत्र मांडण्याचा सदस्यांना अधिकार आहे. हे सूत्र मांडल्यानंतर १ मासात संबंधित खात्याचे अधिकारी उत्तर देतात कि नाही, हे मुख्य सचिवानी पहायला हवे. उत्तर न देणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई केली पाहिजे. विधानसभेचे अध्यक्ष श्री. हरिभाऊ बागडे यांनी सर्व सदस्यांच्या सूचना विचारात घेऊन दोषी अधिकार्‍यांवर कारवाई केली जाईल, असे सांगितले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn