Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

परिस्थिती स्वीकारणे यापेक्षा परिस्थिती चांगलीच आहे, असा संस्कार स्वतःवर करा !

पू. संदीप आळशी
     आजारपण, कौटुंबिक अडचणी, आर्थिक विवंचना, आध्यात्मिक त्रास इत्यादींमुळे त्रस्त झालेले साधक परिस्थिती स्वीकारणे, ही साधना आहे, असा दृष्टीकोन स्वतःला देत असतात. हा दृष्टीकोन योग्यच आहे; पण तरीही यामध्ये एकप्रकारची उदासीनतेची भावना अंतर्मनात वास करून राहू शकते. यासाठी या दृष्टीकोनाच्याही पुढे जाऊन परिस्थिती चांगलीच आहे, असा संस्कार आपण पुढीलप्रमाणे स्वतःवर करू शकतो.
१. देवाने आपल्याला कीडामुंगीप्रमाणे नव्हे, तर मनुष्याचा जन्म दिला आहे; म्हणून आपण साधना करण्याचा विचार तरी करू शकतो.
२. देवाने आपल्याला लुळ्या-पांगळ्याप्रमाणे नव्हे, तर त्यातल्यात्यात धडधाकट देह दिला आहे; म्हणून आपण साधनेचे प्रयत्न तरी करू शकतो.
३. एक वेळच्या जेवणाचीही भ्रांत असलेल्या, निवार्‍यासाठी डोक्यावर छप्पर नसलेल्या, आतंकवादी किंवा वासनांध यांच्या क्रूर अत्याचारामुळे जीवन उद्ध्वस्त झालेल्या व्यक्तीच्या दुःखाला काय पारावार ? देवाच्या कृपेने आपली स्थिती एवढी तर वाईट नाही ना ?
४. अनेक व्यक्तींना देवदुर्लभ मनुष्यजन्म मिळूनही त्यांना साधना करण्याची इच्छाच न झाल्याने त्यांचा जन्म फुकटच जातो. देवाने आपल्याला साधनारत ठेवले आहे. 
५. साधना करणार्‍या अनेक व्यक्तींना साधनेची दिशा देणारे योग्य गुरु न मिळाल्याने त्यांचाही जन्म एकप्रकारे फुकटच जातो. आपल्याला प.पू. डॉक्टरांसारखे केवळ योग्य गुरुच नव्हे, तर देवस्वरूप मोक्षगुरु लाभले आहेत. हे आपले केवढे भाग्य !
      वरील सूत्रांचा मनावर संस्कार केल्यास अधिक सकारात्मक, उत्साही आणि आनंदी रहाण्यास साहाय्य होऊन साधनेत शीघ्र प्रगती होईल.
- (पू.) श्री. संदीप आळशी (६.१२.२०१६) 
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn