Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

हिंदु धर्मजागृती सभेच्या निमंत्रण बैठकांना जळगाव जिल्ह्यात अभूतपूर्व प्रतिसाद !

     जळगाव - सामाजिक दुष्प्रवृत्तींविरुद्ध संघटितपणे अन् वैध मार्गाने कृती करणे, भारतात समान नागरी कायदा, धर्मांतर बंदी कायदा लागू करण्यात यावा, गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर कार्यवाही करावी आणि भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी यासाठी हिंदु जनजागृती समितीने २५ डिसेंबर या दिवशी शिवतीर्थ मैदान येथे सायंकाळी ५.३० वाजता हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन केले आहे.
     या सभेसाठी जळगाव जिल्ह्यात निमंत्रण बैठकांना उत्स्फूर्त प्रतीसाद मिळत असून ठिकठिकाणचे धर्माभिमानी, संघटना, संप्रदाय, सार्वजनिक गणेशोत्सव तसेच दुर्गोत्सव मंडळे हे स्वत: सहभागी होऊन इतर जवळच्या गावांतही बैठकांचे आयोजन करीत आहे.
     पारोळा, धरणगाव, एरंडोल, भुसावळ, चोपडा आणि जळगाव या तालुक्यांतील अनेक गावांमध्ये आतापर्यंत झालेल्या बैठकांना धर्माभिमानी हिंदूंचा भरघोस पाठिंबा मिळत आहे. तसेच वॉट्स अ‍ॅप, फेसबूक आणि ट्विटर या सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमांतूनही जिल्हाभरात हिंदु धर्मजागृती सभेचा विषय पोचवण्यात येत आहे. या सभेच्या कार्यात सहभागी होण्याची ज्यांची इच्छा असेल अथवा साहाय्य करायचे असेल त्यांनी ९४०४९५६०२७ या क्रमांकावर संपर्क साधून धर्मकर्तव्य बजावावे, असे आवाहन सभेच्या आयोजकांनी केले आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn