Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

दत्तगुरूंचा नामजप करत असतांना ‘पूर्वज दत्तगुरु आणि प.पू. डॉक्टर यांच्या चरणी कृतज्ञताभावाने नतमस्तक होऊन गुरुचरणी गेल्यावर मुक्त होत आहेत’, असे दिसणे

      ‘२२.९.२०१६ या दिवशी मी दत्तगुरूंचा नामजप करत असतांना ‘माझ्या समोर दत्तगुरु विराजमान आहेत आणि मी त्यांच्या चरणांशी बसून नामजप करत आहे’, असा भाव ठेवला होता. त्या वेळी मला दिसले, ‘माझे असंख्य पूर्वज दत्तचरणी नतमस्तक होत आहेत आणि त्याच क्षणी त्यांना मुक्ती मिळून ते अदृश्य होत आहेत.’ मी दत्तगुरूंना विचारले, ‘यांना केवळ मी करत असलेल्या नामजपामुळे मुक्ती मिळू शकत नाही. मग हे कसे होत आहे ?’ त्या वेळी दत्तगुरु म्हणाले, ‘तुझ्यामागे कोण आहे, ते बघ.’ मी मागे वळून पाहिल्यावर मला प.पू. डॉक्टर दिसले. त्यांचा आशीर्वादरूपी हात माझ्या डोक्यावर होता आणि त्यांच्या हातांतून पिवळ्या रंगाचे चैतन्य माझ्या सहस्रारचक्रात जात होते. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘गुरुमाऊलीच्या कृपेने दत्तगुरु पूर्वजांना मुक्त करत आहेत.’
   पूर्वजांना गुरुदेवांप्रती कृतज्ञता वाटून ते कृतज्ञताभावाने दत्तगुरु आणि गुरुमाऊलीलाही वंदन करत होते. पूर्वज गुरुचरणी गेल्यावर मुक्त होतांना दिसले. या वेळी मला माझे आजी-आजोबा यांचे तोंडवळे स्पष्टपणे दिसले. मला हे दृश्य २० मिनिटे दिसत होते. दृश्य दिसेनासे झाल्यावर मी दत्तगुरूंना विचारले, ‘आणखी पूर्वज का येत नाहीत ? त्या वेळी ते म्हणाले, ‘सर्वांना मुक्ती मिळाली आहे.’ 
- कु. वर्षा जबडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.९.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn