Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

असाही भ्रष्टाचार !

संपादकीय 
      झाकीर हुसेन मदरसा अनुदान’ ही योजना महाराष्ट्र राज्यशासनाने चालू केली आहे. मुसलमान रहिवाशांच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही योजना राज्यशासनाने चालू केली आहे खरी, परंतु हा लाभ संबंधित मुलांपर्यंत जात आहे, असे खात्रीपूर्वक म्हणण्याची सोय नाही. असे अनेक नतद्रष्ट समाजात वावरत आहेत की, ते भ्रष्ट आणि खोट्या कर्मात व्यग्र असतात. अशांपैकी काही जणांनी मदरसा शाळा केवळ कागदोपत्री दाखवून लाखो रुपयांचे शासकीय अनुदान लाटले असल्याचे उघड झाले आहे. महाराष्ट्रातील संभाजीनगरचे जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील २२५ मदरशांची झडती घेतली आणि उघड केले की, बहुतांश ठिकाणी मदरसे अस्तित्वात नाहीत, अनेक मदरशांमध्ये सोयी-सुविधांचा अभाव आहे आणि अनुदानासाठी विद्यार्थ्यांची संख्या कागदोपत्री दाखवली जात आहे. शासकीय अनुदान लाटण्यासाठी भ्रष्ट मार्गांचा अवलंब करण्याचे केवढे हे धाडस ? शिवसेनेचे परभणी येथील आमदार डॉ. राहुल पाटील यांनी या भ्रष्टाचाराला आळा घालण्याची मागणी नुकतीच विधानसभेत केली. विधानसभेत विषय आला तेव्हा शिवसेनेच्या व्यतिरिक्त किती पक्षांच्या आमदारांनी या रास्त मागणीस पाठिंबा दिला, हे निश्‍चिपणे सांगता येत नाही. तसे पहाता देशात सध्या भ्रष्टाचार आणि काळा पैसा यांविषयी वातावरण ढवळून निघाले आहे. या पार्श्‍वभूमीवर डॉ. राहुल पाटील यांच्या मागणीला निश्‍चितच अर्थ आहे. पोषक वातावरणातच एखादा विषय तडीस लागतो. मागील तीन वर्षांपासून हे मदरसे अनुदान घेत आहेत. प्रत्येक मदरशाला अंदाजे २ ते ४ लाख ५० सहस्र रुपये अनुदान मिळते. म्हणजे ‘झाकीर हुसेन मदरसा अनुदान’ ही शासकीय योजना म्हणजे ‘आंधळ दळतय् अन् कुत्रं पिठ खातय्’, असाच प्रकार झाला. शासनाच्या लोकोपयोगी अशा अनेक योजना असतात. त्यांचा बोजबारा उडाल्याचे अनेकदा ऐकायला येते, त्यामागील कारण हे अशाच प्रकारचा भ्रष्टाचार हेच असते. बँक ठेवीवर व्याज नको म्हणणारे आणि इस्लामिक बँकेचा आग्रह धरणारे अशा भ्रष्टाचाराला का कवटाळतात ? संभाजीनगर शहरातील संवेदनशील भागातील मदरशांची पडताळणी करण्यासाठी शासकीय पथक गेले असता, तेथे संस्थाचालक उपस्थित होते; पण त्यांना मदरसा, विद्यार्थी आणि शिक्षक दाखवता आले नाही. या प्रकाराला काय म्हणायचे ? शासकीय स्तरावरील या गलथानपणाला काय नाव देता येर्ईल ?
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn