Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

काश्मीरसंदर्भात नरमाईचे घातक धोरण सोडून द्यावे ! - पनून कश्मीरची पंतप्रधानांकडे मागणी

     जम्मू - भारत सरकारने काश्मीरविषयी घेतलेले नरमाईचे धोरण बराच काळ टिकून असले, तरी पालटत्या परिस्थितीनुसार ते आता घातक ठरत आहे. पंतप्रधानांनी याची नोंद घ्यावी, अशी पनून कश्मीरची मागणी आहे, असे वक्तव्य पनून कश्मीरचे राज्य संयोजक डॉ. अग्नीशेखर आणि अध्यक्ष डॉ. अजय च्रोंगू यांनी पत्रकारांना संबोधित करतांना केले. विस्थापित काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन करून त्यांच्यासाठी स्वतंत्र केंद्रशासित प्रदेशाची मागणीही या वेळी करण्यात आली. या वेळी पनून कश्मीरचे सरचिटणीस कुलदीप रैना आणि राज्य संघटक संजय मोझा हेही उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत मांडण्यात आलेली सूत्रे 
१. सध्या काश्मीरमध्ये जातीयवादाला खतपाणी दिले जात आहे. सध्याची नॅशनल कॉन्फरन्सची उद्धट, असंदिग्ध आणि फुटीरतावादी भूमिका याला साक्ष आहे. भारताचा जम्मू-काश्मीर प्रांत नेस्तनाबूत करण्याचा उघड प्रयत्न करण्यात येत आहे.
२. वर्ष १९५३ मध्ये ज्या देशद्रोहासाठी आणि विश्‍वासघातासाठी नॅशनल कॉन्फरन्सचे सर्वेसर्वा शेख महंमद अब्दुल्ला यांना अटक करण्यात आली होती, तीच भाषा आज नॅशनल कॉन्फरन्सचे नेते बोलत असल्यामुळे राष्ट्राला पेच पडला आहे. 
३. पीडीपी-भाजप युतीचा मुख्य घटक पीडीपीच सध्याच्या जम्मू-काश्मीरमधील अस्थिर परिस्थितीला खतपाणी घालत आहे. इतकेच नव्हे तर भारताचे उद्दिष्ट डावलून पाकशी संबंध जोडत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. पाकला अपेक्षित असाच त्यांचा कार्यक्रम आहे. 
४. जम्मू-काश्मीरमध्ये ६० लाख हिंदू, शीख अणि बौद्ध आहेत; म्हणून त्यांनाही मुसलमानांप्रमाणेच सर्व हक्क आणि अधिकार मिळायला हवेत. 
५. जम्मू-काश्मीर हा सदैव भारताचाच भाग मानला गेला आहे. नुकतेच पाकव्याप्त काश्मीरमधील आतंकवाद्यांच्या तळांवर भारतीय सैन्याद्वारे करण्यात आलेले सर्जिकल स्ट्राइक, सर्व प्रतिबंध तोडून पाकव्याप्त काश्मीरसहित गिलगिट आणि बाल्टिस्तान हे प्रांतही भारताचाच भाग असल्याचा दावा करणे आणि बलुचिस्तानलाही पाठिंबा देणे या भारताच्या पाकच्या संदर्भातील कृतींचे पनून कश्मीर स्वागत करत आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn