Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

अमेरिकेच्या बाहेर काम घेऊन जाणार्‍या आस्थापनांना किंमत चुकवावी लागेल ! - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प

     वॉशिंग्टन (अमेरिका) - अमेरिकेच्या बाहेर काम घेऊन जाणार्‍या आस्थापनांंना त्याची किंमत चुकवावी लागेल, अशी चेतावणी अमेरिकेचे नविनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांनी नुकतीच दिली आहे.
    ‘कॅरिअर’ या आस्थापनेने इंडियानापोलीस राज्यातील कारखाना बंद करून मॅक्सिको येथे हालवण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे १ सहस्र १०० लोकांच्या नोकर्‍यांना धोका निर्माण झाला होता; परंतु या राज्याकडून ‘कॅरिअर’ला कर सवलत देण्यात आली. त्यानंतर हा कारखाना हालवण्याचा निर्णय मागे घेतला होता. या पार्श्‍वभूमीवर ट्रम्प यांनी वरील चेतावणी दिली होती.
     ट्रम्प म्हणाले, ‘‘आमचे सरकार ‘कॉर्पोरेट कर’ न्यून करेल. त्यामुळे अनेक आस्थापनेही अमेरिकेतच रहाण्याचा विचार करतील; मात्र जी आस्थापने त्यांचे काम बाहेर घेऊन जातील, त्यांना आयातीवरील सीमा कराच्या माध्यमातून किंमत चुकवावी लागेल.’’ कॅरिअरच्या संदर्भात त्यांनी दूरचित्रवाहिनीवर वृत्त पाहिले. या माहितीमुळे त्यांना निवडणुकीत दिलेल्या आश्‍वासनांची आठवण झाली. आम्ही ‘कॅरिअर’ला जाऊ देऊ शकत नाही, असे ते म्हणाले. निवडणूक प्रचाराच्या वेळी ट्रम्प यांनी दुसर्‍या देशांकडून काम करवून घेणार्‍या अमेरिकेच्या आस्थापनांवर टीका केली होती. त्यांच्या या मताला लोकांचे मोठे समर्थन मिळाले होते.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn