Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

मराठा आरक्षणावरून विरोधकांनी केलेल्या गोंधळामुळे विधान परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित

४ वेळा सभागृह स्थगित 
     नागपूर, १४ डिसेंबर (वार्ता.) - येथे झालेल्या मराठा समाजाच्या मूक मोर्च्याचे तीव्र पडसाद १४ डिसेंबर या दिवशीच्या विधान परिषदेच्या कामकाजात दिसून आले. सभागृहाचे कामकाज मराठा आरक्षणाच्या चर्चेवरून ४ वेळा एकूण १ घंटा १० मिनिटांसाठी स्थगित झाले. त्यानंतर चालू झालेल्या कामकाजामध्ये विरोधकांनी घोषणा देत गोंधळ करण्याचा प्रयत्न केला. अशाच परिस्थितीत सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सभेचे कामकाज केले आणि सभा दिवसभरासाठी स्थगित केली. 

१. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरेंद्र पाटील यांनी मराठा समाजाला सर्वच राजकारण्यांनी मतांसाठी वापरले, असे सांगितले. (आरक्षणाची तळी उचलणार्‍या सर्वपक्षीय राज्यकर्त्यांना चपराक ! - संपादक) त्यानंतर शिवसंग्राम पक्षाचे आमदार विनायक मेटे यांना बोलण्यास हरकत घेतल्याने विरोधकांनी केलेल्या गोंधळामुळे कामकाज २ वेळा २५ मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले. 
२. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर करण्याची मागणी सभापतींनी अमान्य केल्याने विरोधकांनी सभापतींसमोरील मोकळ्या जागेत जाऊन घोषणाबाजी केली. त्यामुळे सभापतींनी २ वेळा ४५ मिनिटांसाठी सभागृह स्थगित केले. 
३. सभेचे कामकाज चालू झाल्यावर विरोधकांनी सभापतींसमोर आरक्षणाच्या सूत्रावरून घोषणाबाजी केली. त्या वेळी सभापतींनी प्रश्‍नोत्तराचा तास संपल्याचे कामकाज जाहीर केले आणि सभेचे पुढील कामकाज गोंधळातच चालू ठेवले. हा भाग चालू असतांनाच सभापतींनी या वेळी श्री साईबाबा संस्थानचा वर्ष २०१५-१६ चा वार्षिक अहवाल, तारांकित प्रश्‍न, लक्षवेधी सूचनेची अधिक माहिती, सार्वजनिक उपक्रम समितीचा ११ वा अहवाल आणि महाराष्ट्र स्थानिक सदस्य प्राधिकरण अनर्हता (सुधारणा) विधेयक आवाजी मतदानाने संमत करून घेतले. त्यानंतर सभेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित केल्याचे जाहीर केले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn