Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सनदी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी लगेचच केली स्वेच्छानिवृत्तीची घोषणा !

     नागपूर, १५ डिसेंबर (वार्ता.) - सनदी अधिकारी श्री. चंद्रकांत गुडेवार यांच्या विरोधात प्रविष्ट केलेला हक्कभंग प्रस्ताव विधानसभेत हक्कभंग समितीने एकमताने तो मान्य केला. यानंतर ‘हक्कभंग समितीने सुनावलेली शिक्षा आपल्याला मान्य आहे; मात्र यापुढे शासकीय नोकरीत कार्यरत रहाण्याची आपली इच्छा नाही. त्यामुळे १५ डिसेंबर या दिवशी सोलापूरहून पुणे येथे परत आल्यानंतर लगेचच आपण स्वेच्छा निवृत्तीसाठी आवेदन देणार आहोत’, असे श्री. चंद्रकांत गुडेवार यांनी घोषित केले. 

 केंद्र सरकारच्या निर्देशांनुसारच प्रधानमंत्री आवाज योजनेतून प्रकल्प सादर केला ! 
     केंद्र सरकारच्या निर्देशांनुसारच आपण अमरावतीमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेतून प्रकल्प अहवाल सादर केला होता. तो अहवाल तातडीने देण्याची सूचना केंद्र सरकारने केली होती, असेही गुडेवार यांनी स्पष्ट केले आहे. 
सोलापूरमधील अतिक्रमणे हटवल्याने गुडेवार यांची कारकीर्द गाजली होती ! 
     श्री. चंद्रकांत गुडेवार यांची सोलापूरमधील महापालिका आयुक्त म्हणून कारकीर्द गाजली होती. अतिक्रमण काढणे आणि महापालिकेच्या कह्यातील व्यापारी गाळ्यांची भाडेवाढ करण्यावरून वाद झाला होता. त्या वेळी त्यांचे तेथून स्थानांतर (बदली) करण्यात आले होते. अमरावतीमध्ये आयुक्त म्हणून काम करतांनाही त्यांना अनेकांच्या विरोधाचा सामना करावा लागला होता.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn