Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

पू. (सौ.) सखदेवआजींची सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि पू. डॉ. मुकुल गाडगीळ यांच्यावर असलेली विशेष प्रीती !


पू. (सौ.) सखदेवआजी
‘     संतांची एकमेकांवर प्रीती असतेच, तरीही पू. (सौ.) सखदेवआजींची सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि पू. डॉ. मुकुल गाडगीळ यांच्यावर विशेष प्रीती होती, हे काही उदाहरणांतून लक्षात आले.
१. ५ वर्षांपूर्वी सौ. गाडगीळ यांच्याशी बोलल्यानंतर ‘त्या 
बोललेले शब्द मी कदाचित् विसरीन; पण त्यांच्या बोलण्यातील 
नाद माझ्या कायम लक्षात राहील’, असे पू. आजींनी सांगणे 
      ५ वर्षांपूर्वी पू. आजी डायलिसिससाठी घरी असतांना त्यांचे भ्रमणभाषवर सौ. गाडगीळ यांच्याशी बोलणे व्हायचे. ते बोलून झाल्यावर पू. आजी म्हणाल्या, ‘‘यांचा आवाज ऐकतच रहावासा वाटतो. त्या बोललेले शब्द कदाचित् मी विसरेन; पण बोलण्यातील नाद माझ्या कायम लक्षात राहील.
२. सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकू रामनाथी आश्रमात 
असतांना त्यांनी आणि पू. आजींनी एकमेकींना अधूनमधून भेटणे 
सद्गुरु
(सौ.) अंजली गाडगीळ 
पू. डॉ. मुकुल
गाडगीळ
     ४ वर्षांपूर्वी सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकू रामनाथी आश्रमात असतांना त्या अधूनमधून पू. आजींना भेटण्यास येत. त्यामुळे त्या येण्याची पू. आजी वाट पहात असत. जेव्हा पू. आजी चालू-फिरू शकत असत, त्या वेळी त्या अनेकदा सद्गुरु काकूंच्या खोलीत जाऊन त्यांच्याशी बोलत असत.
३. घरून कोणताही खाऊ आला, तर पू. आजी तो सद्गुरु काकूंना द्यायला सांगत.
४. पू. काकू संत झाल्याचे कळल्यावर त्यांना भेटण्यासाठी पुष्कळ रात्र झालेली असूनही भोजनकक्षात येणे 
      पू. काकूंचा संतसन्मानाचा सोहळा झाल्यानंतर त्या भोजनकक्षात आल्या. तेव्हा पू. आजी त्यांना भेटण्यासाठी भोजनकक्षात आल्या होत्या. त्या वेळी पुष्कळ रात्र झालेली असूनही त्या सद्गुरु (सौ.) काकूंना भेटण्यासाठी थांबल्या होत्या.
५. सद्गुरु काकू दौर्‍यावर जाण्यापूर्वी प्रत्येक वेळी पू. आजींकडे येत असत. त्यांना नमस्कार करून त्या जात. सद्गुरु काकूंची नम्रता पाहून पू. आजींना भरून येत असे.
६. पू. आजींनी सद्गुरु काकूंना स्वतःच्या साड्या वापरण्यास 
सांगणे आणि त्यातून त्यांनी सद्गुरु काकूंना त्यांच्या जवळचे केल्याचे लक्षात येणे 
     ३ वर्षांपूर्वी सद्गुरु काकू दौर्‍यावर जाण्यापूर्वी पू. आजींनी मला ३ - ४ वेळा सांगितले होते, ‘‘मी कुठेच बाहेर जात नाही. त्यामुळे माझ्या पुष्कळ साड्या न वापरता तशाच राहिल्या आहेत. त्या काकूंना घेऊन जाण्याबाबत विचार. त्यांचा प्रवासही पुष्कळ होतो. त्यामुळे त्यांना पुष्कळ साड्या लागतात. जेव्हा माझ्या साड्या लागतील, तेव्हा त्यांना घ्यायला सांग.’’ यातून ‘पू. आजींनी सद्गुरु काकूंना त्यांच्या जवळचे केले होते’, हे लक्षात आले.
७. सद्गुरु काकू दौर्‍यावर जातांना पू. आजी आठवणीने जो असेल, तो खाऊ त्यांना देत.
८. सद्गुरु काकूंच्या मुलीच्या लग्नात घरच्यांप्रमाणे अहेर करणे 
     सद्गुरु काकूंच्या मुलीच्या (कु. सायलीच्या) लग्नाच्या दोन दिवस आधी पू. आजींनी सद्गुरु काकू, पू. काका आणि सायली, तसेच सायलीच्या दोन्ही आजी यांना लग्नाचा अहेर केला होता. सद्गुरु काकूंना द्यायची साडी, पू. काकांना द्यायची शाल, सायलीला द्यायचे पोशाखाचे कापड चांगल्या प्रतीचे आहे, हे त्यांनी आवर्जून पाहिले. शाल, साडी त्यांनी स्वतः निवडले. सोबत काही गोड म्हणून पेढे देण्यास सांगितले.
९. पू. काकाही आठवण आली की कधीही पू. आजींना भेटण्यासाठी येत. त्यात काहीच परकेपणा नसे.
१०. ‘सद्गुरु काकू दौर्‍यावर जाण्यापूर्वी भेटायला येणार आहेत’, 
हे कळल्यावर पू. आजींनी पहाटे सर्व आवरून तयार रहाणे 
     पू. काकू ‘सद्गुरु’ झाल्यानंतर पू. आजींना त्यांना भेटणे शक्य झालेले नव्हते. सद्गुरु काकूंनीही पू. आजींना भेटायला येणार असल्याचे सांगितले होते. सद्गुरु काकू ३ वेळा खोलीत पू. आजींना भेटण्यासाठी आल्या; पण प्रत्येक वेळी पू. आजी झोपलेल्या असल्याने त्यांची भेट झाली नाही. शेवटी दुसरे दिवशी सकाळी सद्गुरु काकू दौर्‍यावर जाण्यासाठी निघणार होत्या, त्या आधी अर्धा घंटा त्या पू. आजींना भेटण्यासाठी खोलीत आल्या. ‘‘सद्गुरु काकू सकाळी भेटायला येणार आहेत’’, असे मी पू. आजींना त्या रात्री जाग्या झाल्यावर सांगितल्याने त्या पहाटे ५ वाजता सर्व आवरून सद्गुरु काकूंची वाट पहात होत्या. सद्गुरु काकूंना भेटून पू. आजींना पुष्कळ आनंद झाला. त्यांनी सद्गुरु काकू, पू. काका आणि काकूंसोबत दौर्‍यावर जाणारे सर्व साधक यांचे एकत्रित छायाचित्र काढण्यास सांगितले.
११. देहत्यागापूर्वी ४ दिवस पू. आजी सद्गुरु काकूंची आठवण काढत होत्या. ‘‘त्या कुठे आहेत ?, त्या (आश्रमात) येणार आहेत का ?’’, असे विचारत होत्या.’
- कु. राजश्री सखदेव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.८.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn