Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

एका संतांच्या मनात ज्ञानप्राप्तीविषयी विकल्प येणे, त्यांनी विचारलेल्या प्रश्‍नाला सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून मिळालेले ज्ञान वाचून त्यांना आश्‍चर्य वाटणे

१. एका संतांच्या मनात गाडगीळकाकूंची परीक्षा घेण्याचा विचार येणे आणि त्यांनी ‘ज्ञान कसे मिळवता ?’ हे पहायचे असल्याचे सांगणे : ‘पूर्वीच्या सुखसागरमध्ये एक संत आले होते. त्या वेळी त्यांच्या मनात गाडगीळकाकूंची परीक्षा घेण्याचा विचार आला. त्यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना विचारले, ‘‘तुमच्याकडे देवाकडून ज्ञान मिळवणार्‍या साधिका आहेत. मला त्या कसे ज्ञान मिळवतात ?, हे बघायचे आहे.’’ तेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले काकू भ्रमणसंगणकावर सेवा करत होत्या तिथे आले आणि त्यांनी सांगितले, ‘‘हे संत आलेले आहेत आणि त्यांना ‘तुम्ही ज्ञान कसे मिळवता ?’ हे पहायचे आहे. त्यांना तुम्हाला प्रश्‍न विचारायचा आहे.’’

२. संतांनी प्रश्‍न विचारताच त्या क्षणी ज्ञान मिळण्यास आरंभ होणे आणि संतांनी ते पाहून परात्पर गुरु डॉ. आठवले अन् काकू दोघांनाही नमस्कार करणे : पू. काकूंची आतून सतत प्रार्थना चालू होती. परात्पर गुरु डॉ. आठवले पू. काकूंच्या मागे उभे होते. संतांनी काकूंना एक प्रश्‍न दिला. नाद, बिंदू आणि कला यांविषयी तो प्रश्‍न होता. प्रश्‍न काकूंना दिला, त्याच क्षणाला ज्ञान यायला चालू झाले आणि ‘नाद’ या विषयाची ८ - ९ ओळींची व्याख्या त्यांनी टंकलिखित केली. तसेच ‘बिंदू आणि कला’ या शब्दांचीही प्रत्येकी ८ - ९ ओळींची व्याख्या त्यांनी टंकलिखित केली. हे त्या संतांनी बघितले आणि ते म्हणाले, ‘‘खरे ज्ञान हेच आहे. नाद, बिंदू आणि कला या शब्दांची व्याप्ती एकेका शब्दात देणे शक्य नाही. त्या किती गतीने ते टंकलिखित करत आहेत. केवढी मोठी गुरुकृपा आहे.’’ त्यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि काकू दोघांनाही नमस्कार केला.’ 
- श्री. दिवाकर आगावणे
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn