Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

दिनांक २५.९.२०१६ - महर्षींनी केरळ राज्यातील पालक्काड येथे झालेल्या सुदर्शन यागात विविध देवतांची यंत्रे भारित करून रामनाथी आश्रमात रक्षणासाठी पाठवण्यास सांगणे, यासाठी महर्षींनी साधकांना केरळमधील एका प्रसिद्ध नंबुद्री घराण्याकडे प्रश्‍नज्योतिषम्साठी पाठवणे आणि याचा वृत्तांत !

केरळ येथील श्री. नंदन प्रसिद्ध नंबुद्री
     ‘सध्या सनातनवर बंदीचे मोठेच संकट आलेले आहे. दूरचित्रवाणीवरूनही सनातनच्या विरोधात अनेक चर्चासत्रे घेतली जात आहेत, तसेच साधकांना दाभोलकर हत्ये प्रकरणी नाहक अटक करून कारागृहातही डांबले जात आहे. न्यायालयात अत्यंत रटाळ पद्धतीने चालणार्‍या आणि भ्रष्ट अधिकार्‍यांच्या अन् राजकारण्यांच्या दडपशाहीमुळे निरपराध लोकांवरच शासन करणार्‍या यंत्रणेलाच धडा शिकवायची वेळ आता आली आहे. यासाठी आता आम्हाला देवाची भक्तीच वाढवायला हवी. देवाची उपासना वाढवणे, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन देवालयात प्रार्थना करणे, यज्ञयाग करणे, यांसारखे उपाय महर्षि आम्हाला सांगत आहेत.  
सद्गुरु सौ. अंजली गाडगीळ यांच्या प्रश्‍नांना उत्तरे देण्यासाठी नंबुद्रींनी टाकलेल्या कवड्या
अ. केरळमधील प्रश्‍नज्योतिषम् पहाणारे नंबुद्री घराणे : यातीलच एक उपाय म्हणून महर्षींनी आम्हाला केरळ राज्यातील एका नंबुद्री घराण्याकडे पाठवले. येथे पारंपारिकरित्या प्रश्‍नज्योतिषम् पाहिले जाते. येथे उत्तर देणाराही साधना करणारा असावा लागतो, तसेच त्याला देवतांचा आशीर्वादही असावा लागतो. महर्षींनी सांगिल्याप्रमाणे आम्ही ‘नंदन’ नावाच्या एका नंबुद्रींकडे (आपल्या प्रश्‍नांना उत्तरे देऊन त्यावर आध्यात्मिक उपाय सांगणार्‍या घराण्यांना केरळमध्ये ‘नंबुद्री’ म्हणतात. मोठमोठ्या देवळांमध्येही काही अडचणी आल्यास नंबुद्रीच त्या अडचणी सोडवतात, तसेच भूतबाधा झाली असेल, तर योग्य आध्यात्मिक उपाय सांगून ती दूर करतात.) गेलो. (छायाचित्र क्र. १ आणि २ पहा)
आ. ‘प.पू. डॉक्टरांमध्ये श्रीकृष्णाचा अंश असल्याने त्यांचे कार्य योग्य पद्धतीने चालू आहे आणि त्यांच्याच हातून सनातन धर्म राज्याची स्थापना होणार आहे’, असे नंबुद्रींनी सांगणे : नंबुद्रींनी आमच्या प्रश्‍नांना उत्तर देण्यासाठी कवड्या टाकल्या असता ‘सनातन धर्म राज्याची स्थापना प.पू. डॉक्टरांच्याच हातून होणार आहे आणि त्यांचे कार्य अवतारी आहे, अशा पद्धतीचे कवडीदान पडले आहे’, असे नंबुद्री म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले, ‘‘देव म्हणत आहे की, तुमचा विजय निश्‍चित आहे. आता कलियुगात नरसिंह अवताराच्या रूपातच देव दुष्टांना शासन करणार आहे.
     प.पू. डॉक्टरांमध्ये श्रीकृष्णाचा अंश असल्याने त्यांचे कार्य अगदी योग्य पद्धतीने चालू आहे. सध्या तुम्हाला काही अडचणी आहेत. यांवर उपाय म्हणून सुदर्शन याग, अघोरास्त्र याग, शत्रूसंहारक याग, गरुड पक्षी याग आणि ईश्‍वरी राज्याच्या स्थापनेसाठी इंद्राणी याग करावा लागेल. तो आपण येथेच करू. आम्ही स्वतःच हा याग करू. तुम्ही केवळ प.पू. डॉक्टरांचे प्रतिनिधी म्हणून यागाला उपस्थित रहा.’’
इ. नंबुद्रींनी सर्व याग तंत्रपद्धतीने करणे : नंबुद्रींनी सांगितल्याप्रमाणे आम्ही २२.९.२०१६ या दिवशी हे सर्व याग तंत्रपद्धतीने केले. या यागात महर्षींनी काही यंत्रे भारित करून रामनाथी आश्रमात रक्षणासाठी पाठवून दिली. त्यांची सूची देत आहे.
१. बारा सुदर्शन यंत्रे (यातील एक यंत्र प.पू. डॉक्टरांच्या खोलीत ठेवायचे आहे आणि बाकीची यंत्रे काही साधकांना रक्षणासाठी द्यायची आहेत.
२. भद्रकाली, सुदर्शन, हनुमान आणि गणपति या देवतांची यंत्रे एकाच पातळ पत्र्यावर एकत्रितपणे कोरलेली आहेत. (एकूण पाच यंत्रे आहेत.) (यांतील एक यंत्र रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात ठेवून बाकीची चार यंत्रे आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकांना द्यावयाची आहेत.)
३. सप्तशती यंत्र (एका मोठ्या पत्र्यावर हे यंत्र कोरले आहे. हे रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात ठेवायचे आहे.)
४. अघोर भैरव यंत्र (एका मोठ्या पत्र्यावर हे यंत्र कोरले आहे. हे रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात ठेवायचे आहे.)
५. अष्टविनायक यंत्र (एका मोठ्या पत्र्यावर हे यंत्र कोरले आहे. हे रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात ठेवायचे आहे.)
ई. प्रार्थना : विविध उपायांद्वारे सतत साधकांच्या रक्षणाचा विचार करणार्‍या आणि साधकांवर आपल्या कृपेचा वर्षाव करणार्‍या महर्षींच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !’
- (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ, उटी, तमिळनाडू. (२५.९.२०१६, सकाळी ८.३८)

धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn