Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

विरोधकांनी केलेल्या गोंधळातच विधानसभेचे कामकाज पूर्ण करून सभागृह दिवसभरासाठी स्थगित

३ वेळा सभागृहाचे कामकाज स्थगित आणि १ वेळा सभात्याग 
सातत्याने सभागृहाचे कामकाज स्थगित होणे, ही जनतेच्या पैशाशी केलेली प्रतारणाच ! 

विधानसभा
     नागपूर, १३ डिसेंबर (वार्ता.) - विधानसभेचे कामकाज चालू होताच विरोधी पक्षाने दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ही मागणी करतांना विरोधी पक्षाने गोंधळ घालून घोषणा देत सभात्याग केला. कामकाज चालू झाल्यावर दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांच्या राजीनाम्यावरून विरोधकांनी गोंधळ घातल्याने ३ वेळा म्हणजेच, एकूण ४५ मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले. असे असतांनाही सभापती हरिभाऊ बागडे आणि सत्ताधारी पक्ष यांनी सभेचे कामकाज पुकारले अन् दिवसभराचे कामकाज पूर्ण केले. त्यानंतर सभागृह दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. 

१. प्रश्‍नोत्तराच्या तासानंतर सभागृहाचे कामकाज १५ मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले. त्यानंतर चालू झालेल्या कामकाजाच्या वेळी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात उत्तर द्यावे, यासाठी विरोधकांनी गोंधळ घातल्याने सभागृहाचे कामकाज पुन्हा स्थगित करण्यात आले. त्यानंतर फडणवीस यांनी सभागृहात सांगितले की, प्रविष्ट करण्यात आलेल्या गुन्हा हा न्यायप्रविष्ट असून न्यायालयाच्या आदेशानुसार महादेव जानकर यांच्या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. त्यानंतर न्यायालयात जो अहवाल सादर होईल, त्यानुसार कारवाई केली जाईल. 
२. मुख्यमंत्र्यांच्या उत्तराने विरोधकांचे समाधान न झाल्याने विरोधकांनी पुन्हा गोंधळ घातल्याने सभागृह पुन्हा स्थगित करण्यात आले. यानंतर सभागृह चालू झाल्यावर विरोधक करत असलेल्या गोंधळातच दिवसभराचे कामकाज पूर्ण करून सभागृह स्थगित करण्यात आले.
 दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्या 
राजीनाम्यासाठी विरोधकांचे विधानसभेबाहेर धरणे आंदोलन 
     नागूपर, १३ डिसेंबर (वार्ता.) - निवडणूक निर्णय अधिकार्‍यावर दबाव आणल्याप्रकरणी दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विधानसभेच्या बाहेर घोषणाबाजी करत धरणे आंदोलन केले. या आंदोलनात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार जयंत पाटील, भास्कर जाधव, काँग्रेसचे आमदार नितेश राणे आदींसह अनेक जण सहभागी झाले होते. 
     या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील तटकरे यांनी जानकर यांच्या हकालपट्टीची मागणी केली. 
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn