Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

दत्ताच्या नामाने अतृप्त पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण कसे होते ?

१. संरक्षक-कवच निर्माण होणे 
     दत्ताच्या नामजपातून निर्माण होणार्‍या शक्तीने नामजप करणार्‍याच्या भोवती संरक्षक-कवच निर्माण होते.
२. अतृप्त पूर्वजांना गती मिळणे 
    बहुतेक जण साधना करत नसल्यामुळे ते मायेत सर्वाधिक गुरफटलेले असतात. यामुळे मृत्यूनंतर अशांचा लिंगदेह अतृप्त रहातो. असे अतृप्त लिंगदेह मर्त्यलोकात अडकतात. (मर्त्यलोक हा भूलोक आणि भुवलोक यांच्या मध्ये आहे.) दत्ताच्या नामजपामुळे मर्त्यलोकात अडकलेल्या अतृप्त पूर्वजांना गती मिळतेे. त्यामुळे पुढे ते त्यांच्या कर्मानुसार पुढच्या पुढच्या लोकात गेल्याने साहजिकच त्यांच्यापासून व्यक्तीला होणार्‍या त्रासाचे प्रमाण घटते.
अनुभूती 
    साधिकेने दत्ताचा नामजप चालू केल्यावर अतृप्त पूर्वजांनी तिला विरोध करणे आणि ‘मला साधना करू दिलीत, तर तुम्हाला गती मिळेल’, असे साधिकेने त्यांना समजावल्यावर त्यांनी साधिकेला विरोध न करणे : ८.४.२००२ या दिवशी सकाळी ६.३० वाजता मला घराच्या आतल्या खोलीत नागासारख्या काळ्या आकृत्या दिसल्या. तेव्हा मी दत्ताचा नामजप करत होते. नामजप करतांना मला असे ऐकू आले, ‘तू नामजप करू नकोस. आम्हाला त्रास होतो.’ मी त्यांना विचारले, ‘तुम्हाला काय हवे ?’ त्यावर ते म्हणाले, ‘आम्हाला मुक्ती हवी आहे.’ त्या वेळी माझ्या घशात दाब जाणवत होता. मी त्यांना म्हटले, ‘मला साधना करू दिलीत, तर तुम्हाला गती मिळेल. मला त्रास देऊ नका.’ त्यांनी ते मान्य केले आणि मग माझ्या घशातील दाब न्यून झाला. - कु. मधुरा भोसले, सनातन संस्था
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn