Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

केंद्रामध्ये तुमच्या पक्षाची सत्ता आहे, तर तुम्ही थेट त्याच्याकडे दाद का मागत नाही ? - सर्वोच्च न्यायालयाने भाजपच्या प्रवक्त्याला फटकारले

न्यायालयाचे फटकारे 
* वारंवार याचिका प्रविष्ट करण्यासाठी पक्ष तुम्हाला पैसे देतो का ?
* भाजपने तुमच्यावर केवळ हेच दायित्व सोपवले आहे का ?
      नवी देहली - सर्वोच्च न्यायालयात सातत्याने याचिका प्रविष्ट करणारे देहलीतील भाजपचे प्रवक्ता अश्‍विनी उपाध्याय यांना न्यायालयाने फटकारल्याची घटना समोर आली आहे. उपाध्याय यांनी प्रविष्ट केलेल्या एका याचिकेवरील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने त्यांना फटकारतांना म्हटले की, आम्ही तुम्हाला प्रतिदिन याचिका प्रविष्ट करतांना पहात असतो. तुम्ही एक ‘व्यावसायिक याचिकाकर्ते’ व्हायला पाहिजे. केंद्रामध्ये तुमच्या पक्षाची सत्ता आहे. जर तुम्हाला काही समस्या असेल, तर तुम्ही सरळ त्याच्याकडे का दाद मागत नाही ? राजकीय लाभासाठी कार्यकर्त्यांकडून न्यायालयाचा वापर व्हावा, अशी आमची इच्छा नाही. पक्ष तुम्हाला न्यायालयात राजकीयदृष्ट्या सक्रीय रहावे, यासाठीच पैसा पुरवतो का ? भाजपने तुमच्यावर केवळ हेच दायित्व सोपवले आहे का ? न्यायालयात पक्षाचा प्रचार करण्यासाठीच भाजप तुम्हाला पैसा पुरवत आहे का ?’, असे प्रश्‍नही न्यायालयाने विचारले. याबरोबर न्यायालयाने उपाध्याय यांची याचिका फेटाळून लावली. 
     गेल्या महिन्यात देहली उच्च न्यायालयाने प्रविष्ट करण्यात आलेल्यांपैकी अनेक याचिका विनाकारण करण्यात आल्याचा निष्कर्ष काढला होता. ८० टक्के याचिका या समोरच्या व्यक्तीला ब्लॅकमेल करण्यासाठी केल्या जात असल्याचाही निष्कर्ष उच्च न्यायालयाच्या खंडपिठाने काढला होता.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn