Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

‘भारतरत्न’ पुरस्कारासाठी स्वत:च स्वत:ची निवड करून घेणारे नेहरू आणि इंदिरा गांधी !

       ‘भारतरत्न’ हा देशाचा सर्वोच्च सन्मान आहे. या अलंकाराने त्या व्यक्तींना सन्मानित केले जाते ज्यांनी देशाच्या एखाद्या क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण कार्य केले असेल, आपापल्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करून आपल्या देशाचा मान वाढवला असेल आणि आपल्या देशाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून दिली असेल. भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. कला, साहित्य, विज्ञान, राजनीतीज्ञ, विचारवंत, वैज्ञानिक, उद्योगपती, लेखक आणि समाजसेवक यांना अद्वितीय सेवांसाठी हा पुरस्कार सरकारकडून दिला जातो. याचा आरंभ भारताचे तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी २ फेब्रुवारी १९५४ या दिवशी केला. या पुरस्कारांतर्गत एक सन्मानपत्र आणि मानचिन्ह दिले जाते. या पुरस्कारांतर्गत कोणत्याही प्रकारची रोख रक्कम दिली जात नाही. आजपर्यंत देश-विदेशातील एकूण ४५ महान व्यक्तींना ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यातील केवळ ६ व्यक्ती आता जीवंत आहेत; परंतु आम्हा देशवासियांना विचार करायला हवा की, भारत सरकारच्या सर्वोच्च पदावर आरूढ मागील २ पंतप्रधानांनी स्वतःलाच ‘भारतरत्न’ दिले होते. ते दोघे म्हणजे भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि त्यानंतर त्यांची राजकीय वारस, त्यांची कन्या इंदिरा गांधी ! त्यांनी जिवंतपणी स्वत:च स्वत:ची ‘भारतरत्न’ पुरस्कारासाठी निवड करून घेतली आणि हा पुरस्कार स्वतःला बहाल करून घेतला.’
- श्री. दिलेर सिंह बग्गा (संदर्भ : ‘मासिक राष्ट्रबोध’, जून २०१६)धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn