Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

फारूख अब्दुल्ला यांच्यावर देशद्रोहाचा खटला प्रविष्ट करा ! - काश्मिरी पंडितांच्या संघटनांची मागणी

अशी मागणी का करावी लागते ? सरकारला हे का कळत नाही कि सरकारला तसे करावेसे वाटत नाही ?
   जम्मू - फारूख अब्दुल्ला यांनी केलेल्या राष्ट्रविरोधी वक्तव्यांवरून काश्मिरी पंडितांच्या संघटनांनी जम्मू येथे निदर्शन केले. फारूख अब्दुल्ला यांच्या विरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. अब्दुल्ला यांनी हुर्रीयत कॉन्फरन्सच्या स्वतंत्र काश्मीरच्या मागणीचे समर्थने केले; म्हणून आम्ही देशद्रोहाचा खटला प्रविष्ट करण्याची मागणी करत आहोत, असे ऑल पार्टीज माइग्रंट्स कोऑर्डिनेशन कमिटी (एपीएम्सीसी)चे राष्ट्रीय प्रवक्ता किंग भारती यांनी म्हटले आहे.
   हजरतबलमध्ये शेख अब्दुल्ला यांच्या १११ व्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करतांना स्वतंत्र काश्मीरच्या मागणीचे मी समर्थन करतो. आम्ही तुमच्यासमवेत आहोत, असे फारूख अब्दुल्ला यांनी म्हटले होते. 
   आतंकवादी बुरहान वानीच्या मृत्यूनंतर काश्मीर खोर्‍यात अशांतता निर्माण करणार्‍यांचे नॅशनल कॉन्फरन्स समर्थन करत आहे, असा आरोप भाजपने केला आहे. (असे आरोप करणे नाही, तर सत्ता हातात असतांना त्यांच्यावर कारवाई करणे भाजप-पीडिपी शासनाकडून अपेक्षित आहे ! - संपादक)
काश्मीरमधील अराजकामागे फारूख अब्दुल्ला यांचा हात ! - मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती, जम्मू-काश्मीर
अब्दुल्ला यांचा हात आहे, तर कारवाई का करत नाही ?
   जम्मू - काश्मीरमधील अराजकामागे फारूख अब्दुल्ला यांंचा हात आहे, असा आरोप मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी केला आहे. मुफ्ती म्हणाल्या की, अब्दुल्ला यांनी फुटीरतावादी हुर्रीयत कॉन्फरन्सचे समर्थन करून खोर्‍यात झालेल्या हिंसाचारात त्यांच्या पक्षाचे लोक असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य केले आहे. आता काश्मीर खोरे शांत होत असल्याने अब्दुल्ला अस्वस्थ झाले आहेत. त्यांना काश्मीरमध्ये शांतता नको आहे. अराजकता निर्माण करून सरकारला हटवणे आणि स्वतः सत्तारूढ होणे यासाठी त्यांनी काश्मिरी जनतेच्या जिवाशी खेळ चालू केला आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn