Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

मेरठमधील मदरशात मुलाला साखळीने बांधून ठेवल्याची घटना उघड !

मदरशांत मुलांवर शारीरिक आणि लैंगिक अत्याचार होतात, 
त्यांना जिहादचे शिक्षण दिले जाते, हे सातत्याने समोर येऊनही अशा 
मदरशांना सरकार अनुदान देते, ही घटना लोकशाहीला निरर्थक ठरवते ! 
     मेरठ (उत्तरप्रदेश) - उत्तरप्रदेशच्या मुझफ्फरनगर शहराजवळ असलेल्या फुलाट येथील मदरशात एका १० वर्षाच्या मुलाला साखळीने बांधून ठेवण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. पायाला बांधलेल्या साखळ्यांमधून सुटका करून घेऊन या मुलाने मदरशातून पलायन केले. तेथून पळून जात असतांना तो एका तलावात पडला. गावकर्‍यांनी त्याला तलावातून बाहेर काढून त्याचा जीव वाचवला. या मुलाची गावकर्‍यांनी एक चित्रफीत बनवली असून ती सामाजिक माध्यमांवर (‘सोशल मीडिया’वर) प्रसारित केली आहे. 
     या मुलाला त्याचे कुटुंबीय मदरशामध्ये घेऊन आले होते. त्याने शिकावे यासाठी मुलाला ते मदरशामध्ये सोडून निघून गेले. हा मुलगा पळून जाऊ नये, म्हणून मदरशाच्या प्राचार्याने त्याच्या पायात साखळी बांधून त्याला कैद करून ठेवल्याचा आरोप करण्यात येत आहे. पोलिसांनी मात्र त्याला साखळीने बांधून ठेवल्याचा आरोप फेटाळला आहे. फुलाट गावच्या सरपंचांनी मात्र मुलाला साखळीने बांधून ठेवल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे. मदरशाच्या व्यवस्थापकांकडून या घटनेविषयी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही.धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn