Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता !

वाचा नवीन सदर
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसंदर्भातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे विचारधन !
     ‘वर्ष २०२३ पासून ‘हिंदु राष्ट्र’ येईल’, हे आजवर अनेक संतांनी वेळोवेळी सांगितले आहे. तथापि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेविषयी कोणत्याही आशादायी घटना स्थुलातून घडत नसतांना असे सांगणे, ही काहींना अतिशयोक्ती वाटेल; पण संतांमध्ये काळाच्या पडद्याआड पहाण्याचे सामर्थ्य असते. म्हणूनच अशा द्रष्ट्या संतांच्या मार्गदर्शनाखाली आपण त्या दिशेने प्रयत्न करणे, हीच आपली साधना आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेविषयी अनेकांंच्या मनात उत्सुकता आहे. या विषयीची सविस्तर माहिती ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा’ या नियमित सदरात आपल्याला मिळेल. आगामी काळात हिंदु समाजाला भारतभूमीत रामराज्याची अनुभूती देणारे ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करण्यासाठी खारीचा नव्हे, तर श्री हनुमंताचा वाटा उचलण्याची प्रेरणा यातून मिळावी, अशी ईश्‍वरचरणी प्रार्थना !
५. हिंदु राष्ट्राची स्थापना झाल्यानंतरच 
‘चांगले दिवस’ (‘अच्छे दिन’) येतील !
     ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘चांगले दिवस’ (‘अच्छे दिन’) येणार’, असे सांगितले आहे. ते देशवासियांना आश्‍वस्त करण्यासाठी मानसिक स्तरावरचे आहे. त्याला मागील भ्रष्ट राजसत्तांच्या तुलनेत नवीन राजकीय सत्तेच्या ५ वर्षांच्या कालावधीतील निर्णयांच्या संदर्भात पहायला हवे. आध्यात्मिक स्तरावर कार्य करणार्‍यांना ‘२०२३ या वर्षी भारत धर्माधिष्ठित ‘हिंदु राष्ट्र’ होईल’, याचे यथोचित ज्ञान असल्याने ते तात्कालिक राजकीय परिवर्तनाने हुरळून जात नाहीत. तसेच त्यांचे आध्यात्मिक स्तरावरील कार्यही निरंतर चालू रहाते.
     अनेक संत आणि भविष्यवेत्ते यांनीही सांगितले आहे, ‘कालमहात्म्यानुसार भयानक आपत्काळ येणार आहे. मोठा विनाश करणारे तिसरे महायुद्ध होणार आहे.’ सध्याच्या आधुनिक भारतियांचा पाश्‍चात्त्यांवर अधिक विश्‍वास असल्यामुळे काही पाश्‍चात्त्य भविष्यवेत्त्यांची भाकिते पुढे दिली आहेत.
५ अ. भविष्यकार नॉस्ट्रॅडॅमस यांनी केलेली भविष्यवाणी : नॉस्ट्रॅडॅमस यांच्यानुसार तिसरे महायुद्ध २७ वर्षे चालेल. या काळात जगातील अनेक शहरे नष्ट होतील आणि कोट्यवधी लोक मृत्यूमुखी पडतील. ‘आतंकवादाचा राजा’ पराभूत होईल. तिसर्‍या महायुद्धानंतर पुढील १ सहस्र वर्षे जगात शांती नांदेल. (http://en.wikipedia.org/wiki/The_Man_Who_Saw_Tomorrow
५ आ. एडगर केस (Edgar Cayce) यांची भविष्यवाणी : तिसरे महायुद्ध इजिप्त, लिबिया या परिसरात होईल. (http://www.alamongordo.com/tag/edgar-cayce-prophesied-third-world-war-would-start-in-the-area-of-tunis-libya-egypt/) सध्या भारतातीलच नव्हे, तर जगभरातील आतंकवाद्यांच्या ज्या बातम्या प्रतिदिन वाचण्यात येतात, त्या तिसर्‍या महायुद्धाची पूर्वसूचना समजून आतापासूनच युद्धासाठी शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक या सर्व स्तरांवर आणीबाणीची स्थिती समजून प्रयत्न केले, तरच तिसर्‍या महायुद्धाच्या समाप्तीनंतर २०२३ या वर्षी हिंदु राष्ट्राची स्थापना होऊन खरोखरच ‘चांगले दिवस’ (‘अच्छे दिन’) येतील; कारण त्याला साधनेचा पाया असेल !’ (१५.१.२०१५) (क्रमश:)
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा’)
हा ग्रंथ ऑनलाइन खरेदीसाठीही उपलब्ध ! 
     यासाठी ‘सनातन शॉप’ च्या संकेतस्थळावरील पुढील लिंकला भेट द्या : goo.gl/TxlFr0
(टीप : या लिंकमधील काही अक्षरे ‘कॅपिटल’ असल्याची नोंद घ्यावी.)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn