Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

३१ डिसेंबर या दिवशी एकही अपप्रकार घडू देणार नाही ! - सुनील गोडसे, पोलीस निरीक्षक, मंचर

ख्रिस्ती नववर्षाच्या पार्श्‍वभूमीवर होणारे अपप्रकार रोखण्यासाठी पुणे पोलिसांना निवेदने 
पुणे ग्रामीण (अभिरूची) पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार
बाळासाहेब जगताप(उजवीकडे) यांना निवेदन देतांना धर्माभिमानी
सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे (सनसिटी) पोलीस नाईक
किरण देशमुख (डावीकडे) यांना निवेदन देतांना धर्माभिमानी
मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गोडसे
(डावीकडून पहिले) यांना निवेदन देतांना धर्माभिमानी
चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
विठ्ठल कुबडे (डावीकडे) यांना निवेदन देताना समितीचे कार्यकर्ते
वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस अधीक्षक अमृत मराठे
(डावीकडून दुसरेे) यांना निवेदन देताना समितीचे कार्यकर्ते
      पुणे, ४ डिसेंबर (वार्ता.) - ख्रिस्ती नववर्षाच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्याच्या हेतूने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांना निवेदन देण्यात आले. त्या वेळी ‘३१ डिसेंबरला एकही अपप्रकार होणार नाही, अशी उपाययोजना करू’, असे आश्‍वासन श्री. गोडसे यांनी दिले. या प्रसंगी धर्माभिमानी सर्वश्री एकनाथ वाघ, वैभव वाघ, रामकृष्ण शिंदे, समितीचे गणेश काजळे, विठ्ठल वायकर, गणेश नवले आणि दिलीप शेटे उपस्थित होते. 
      पाश्‍चात्त्य प्रथांच्या वाढत्या अंधानुकरणामुळे देशभर नववर्ष हे गुढीपाडव्याच्या ऐवजी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री १२ वाजता साजरे करण्याची कुप्रथा मोठ्या प्रमाणात वाढीस लागली आहे. या निमित्ताने मद्यपान, तसेच अमली पदार्थ यांचे सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे. बीभत्स गाण्यांच्या तालावर अश्‍लील अंगविक्षेप करून नाचणे, शिवीगाळ करणे, तसेच मुलींची छेडछाड करणे आदींमुळे कायदा-सुव्यवस्था यांच्या दृष्टीने गंभीर स्थिती निर्माण होत आहे. त्यामुळेच हे अपप्रकार रोखण्यासाठी ३१ डिसेंबरच्या रात्री राज्यातील प्रमुख पर्यटन स्थळे, गड-किल्ले यांंसारख्या ऐतिहासिक वास्तू, तसेच सार्वजनिक ठिकाणी मद्यपान आणि धूम्रपान, तसेच मेजवान्या करण्यास प्रतिबंध करण्यात यावा, अशा आशयाचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पोलीस प्रशासनाला देण्यात आले.
१. हवेली पोलीस ठाणे - पुणे ग्रामीण (अभिरूची) येथे ठाणे अंमलदार बाळासाहेब जगताप यांना निवेदन देण्यात आले. या वेळी धर्माभिमानी सर्वश्री गणेश पवार, मनोहरलाल उणेचा, ईश्‍वर तांदळे, समितीचे कृष्णाजी पाटील, विनायक बागवडे आणि शशांक सोनवणे उपस्थित होते. या वेळी पोलीस ठाण्यातील लिपिकाने ‘मला समितीचे कार्य आवडले’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. सिंहगड रस्ता पोलीस ठाणे-सनसिटी येथे पोलीस नाईक (वैयक्तिक) किरण देशमुख यांनाही निवेदन देण्यात आले. 
२. चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांना समितीचे सर्वश्री नीलेश जोशी, सच्चिदानंद कुलकर्णी, जयेश बोरसे यांनी, तर वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस अधीक्षक अमृत मराठे यांना समितीचे सर्वश्री मिलिंद धर्माधिकारी, श्याम घागरे, कृष्णा कुंभार, आनंद कुलाल यांनी निवेदन दिले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn