Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

संस्कृती भ्रष्ट करणारा आणि तरुण पिढीला व्यसनाधीन बनवणारा सनबर्न फेस्टिव्हल रहित करा !


डावीकडून श्री. चंद्रकांत वारघडे, अधिवक्ता श्री. मोहनराव डोंगरे,
सर्वश्री पराग गोखले, चैतन्य तागडे आणि आनंद दवे
हिंदु जनजागृती समितीची पत्रकार परिषदेद्वारे मागणी
     पुणे, १६ डिसेंबर (वार्ता.)- अमली पदार्थांचा अपवापर आणि अनैतिक कृत्ये यांमुळे कुप्रसिद्ध ठरलेला आणि गोव्यातून हाकलण्यात आलेला सनबर्न फेस्टिव्हल सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी असलेल्या पुण्यात होत आहे. गोवा शासनाने या फेस्टिव्हलच्या आयोजकांना ३ कोटी रुपयांचा थकवलेला कर भरण्याचा आदेश दिला आहे. असा हा फेस्टिव्हल पुण्यात झाल्यावर आयोजक महाराष्ट्र शासनाचा कर जमा करतील का, याची निश्‍चिती न करताच शासकीय अधिकार्‍यांनी या फेस्टिव्हलला अनुमती दिली आहे.
केसनंद गावात ग्रामदेवतेच्या मंदिराजवळच या फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे या महोत्सवाला स्थानिकांचा विरोध आहेच, तसेच तेथील भक्तांचाही याला विरोध आहे. समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी फेस्टिव्हलला जाहीरपणे विरोध केला आहे. एकीकडे व्यसनाधीनतेमुळे तरुण मुलांचे मृत्यू होत असतांना तरुण पिढीला व्यसनाधीनतेकडे वळवणारा आणि संस्कृती भ्रष्ट करणारा हा सनबर्न फेस्टिव्हल रहित झालाच पाहिजे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे पुणे समन्वयक श्री. पराग गोखले यांनी केली. १६ डिसेंबर या दिवशी पुणे येथील पत्रकार भवनात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
     या वेळी माहिती सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री. चंद्रकांत वारघडे, प्रखर हिंदुत्ववादी अधिवक्ता श्री. मोहनराव डोंगरे, हिंदुत्वनिष्ठ आणि अभ्यासक, तसेच अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष श्री. आनंद दवे, राष्ट्रीय चर्मकार संघाचे अतुल पोटे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. चैतन्य तागडे उपस्थित होते.
     श्री. पराग गोखले पुढे म्हणाले, फेस्टिव्हलच्या रंगभूमीवर नटराजाची प्रतिकृती ठेवली जाते. तिच्यासमोर सर्वजण अंगविक्षेप करत नाचतात. नटराज म्हणजे शिवाचे रूप असून असे करणे म्हणजे त्याचा अवमानच आहे. स्थानिक गावकर्‍यांचाही या कार्यक्रमाला विरोध आहे. वाघोली येथे या संदर्भात १५ डिसेंबरला घेण्यात आलेल्या बैठकीत ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी एकमुखाने हा कार्यक्रम होऊ देणार नाही, असे सांगितले आहे.
सनबर्न म्हणजे हिंदु धर्मावरील संकट ! - अधिवक्ता मोहनराव डोंगरे
      पुण्यात होणारा सनबर्न फेस्टिव्हल हा आमचे हिंदु मन बर्न (जाळणारा) करणारा आहे. यासाठी १० सहस्र रुपयांच्या रोख रकमेचे तिकीट दर लावण्यात आलेत. इकडे लोकांना रांगांमध्ये थांबून पैसे मिळत नाहीत आणि चैनीसाठी मात्र एवढे पैसे उधळणे किती लज्जास्पद आहे. हिंदूंचे प्रश्‍न सोडवू, असे म्हणणारे हे सरकार सत्तेत येऊनही हिंदूंचे प्रश्‍न सुटले नाहीत. शेतभूमीत असा कार्यक्रम करण्याला कायद्याने अनुमती नसतांनाही तरीही हा कार्यक्रम केला जात आहे. कार्यक्रमासाठी जागा उपलब्ध व्हावी; म्हणून पुष्कळ वृक्षतोडही येथे झाली आहे. हे फेस्टिव्हल म्हणजे हिंदु संस्कृतीवर घाला असून हिंदु धर्मावरील मोठे संकट आहे. या फेस्टिव्हलला विरोध करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांना पत्रकार परिषद घ्यावी लागते, हेच मुळात खेदजनक आहे.
अनुमती नसतांना अवैधरित्या फेस्टिव्हलचे आयोजन ! - श्री. चंद्रकांत वारघडे
     केसनंद परिसरामध्ये ४-५ महाविद्यालये आहेत. या कार्यक्रमामुळे तेथील विद्यार्थ्यांवर परिणाम होण्याची शक्यता अधिक आहे. फेस्टिव्हलच्या माध्यमातून अवैधरित्या गौण खनिजाचे उत्खननही केले जात आहे. कार्यक्रमाच्या विरोधात आम्ही माहिती अधिकारातून माहिती मागवली आहे; मात्र तीही अजून उपलब्ध करण्यात आलेली नाही. शासन, तहसीलदार आणि वन खाते यांची अनुमती नसतांनाही हा कार्यक्रम घेतला जात आहे.
शासकीय अनुमती नसलेला कार्यक्रम आम्ही होऊ देणार नाही ! - आनंद दवे
      या कार्यक्रमाला आमचा पूर्ण विरोध आहे. तरीही हा कार्यक्रम होणार असेल, तर आम्ही सर्व कार्यर्त्यासहित तेथे उपस्थित राहून कुणालाही प्रवेश करून देणार नाही. शासकीय अनुमती नसतांना असा कार्यक्रम करणे अयोग्य आहे आणि ते आम्ही होऊ देणार नाही.
अतुल पोटे - संस्कृतीरक्षणाच्या या कार्यात आम्ही सहभागी आहोत. हा फेस्टिव्हल रहित होण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn