Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

आदर्श व्यक्तीमत्त्व आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वभावदोष घालवून स्वतःत ईश्‍वरी गुण आणणे आवश्यक ! - संजय जोशी

पेंडखळे (ता. राजापूर) येथे स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग प्रशिक्षकनिर्मिती कार्यशाळा
लाठीकाठीची प्रात्यक्षिके करतांना प्रशिक्षणार्थी
    राजापूर (रत्नागिरी) - छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, स्वातंत्र्यवीर सावरकर यांसारखे राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक यांची नावे इतिहासात अजरामर झाली; कारण त्यांच्यात अन्यायाविरोधात चीड, प्रखर राष्ट्रभक्ती आणि धर्मप्रेम, नेतृत्व करणे, नियोजन कौशल्य, साहस, दुर्दम्य इच्छाशक्ती, साधनेचे बळ असे अनेक गुण होते. म्हणूनच तेे आपले खरे आदर्श होऊ शकतात. चित्रपट कलाकार किंवा क्रिकेटपटू हे आपले आदर्श होऊ शकत नाहीत. जीवनात यशस्वी व्हायचे असेल, तर आपल्याला जास्तीतजास्त ईश्‍वरी गुण स्वतःत आणावे लागतील आणि दोष घालवावे लागतील, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. संजय जोशी यांनी केले. तालुक्यातील पेंडखळे येथील निनावेवाडीतील श्री ब्राह्मणदेव मंदिर येथे पार पडलेल्या स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग प्रशिक्षकनिर्मिती कार्यशाळेत ते बोलत होते.
     श्री. जोशी म्हणाले की, स्वतःतील दोष हे कृतीतून आणि मनात येणार्‍या विचारांवरून लक्षात येतात. यासाठी प्रतिदिन स्वत:कडून घडणार्‍या अयोग्य कृती, मनात येणारे अयोग्य विचार लिहून त्यापुढे योग्य कृती आणि योग्य विचार कोणता असायला हवा, हेही प्रतिदिन सारणीत लिहून स्वतःकडून प्रतिदिन योग्य कृती आणि योग्य विचार कसा होईल, याकडे लक्ष द्यायला हवे. स्वभावदोषांमुळे दुःख, अडचणी, ताण-तणाव, शारीरिक अस्वास्थ्य निर्माण होते, तर गुणांमुळे आनंदी जीवन जगता येते. प्रत्येकाने वेळेचे पालन करणे, व्यवस्थितपणा, नियोजन कौशल्य, नम्रपणा, गुरुजनांचा आदर, सकारात्मक रहाणे, प्रामाणिकपणा, इतरांना साहाय्य करणे, काटकसर इत्यादी किमान गुण अंगी बाणवणे आवश्यक आहे.
      प्रतिदिन काही वेळ व्यायाम केल्याने शारीरिक बळ प्राप्त होते, आपल्यातील दोष घालवून गुण आणल्याने मानसिक बळ मिळते, तर कलियुगातील श्रेष्ठ साधना म्हणजे कुलदेवता आणि श्री दत्तगुरु यांचा नामजप यांमुळे मानसिक आणि आध्यात्मिक बळ प्राप्त होते. या सर्व गोष्टी आत्मसात करण्यासाठी स्वतःच्या दिनक्रमाचे नियोजन करून त्यानुसार कृती कराव्यात, असे आवाहन श्री. जोशी यांनी प्रशिक्षणार्थींना केले.
     या कार्यशाळेत भू, पेंडखळे, खिणगिणी, ओणी येथील ७ स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांतील निवडक १९ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. या वेळी स्वसंरक्षण प्रशिक्षण, तसेच लाठीकाठी प्रात्यक्षिके, राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे विषय मांडणे यांचा सराव घेण्यात आला. 
      कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री. महेश मांडवकर यांनी केले. कु. योगेश कांबळे आणि कु. नीलेश लोळगे पुष्प देऊन यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. स्वसंरक्षण प्रात्यक्षिकांचा सराव श्री. वसंत दळवी आणि श्री. विनायक राऊत यांनी प्रशिक्षणार्थींकडून करवून घेतला.
प्रशिक्षणार्थींचे अभिप्राय 
१. कु. सुशांत सुभाष निनावे, मधली निनावेवाडी, पेंडखळे : आजच्या वर्गाचा लाभ मला पुढील आयुष्यासाठी होईल. आमच्या वाडीतही याचा प्रसार करीन.
२. कु. तेजस दीपक राऊत, खिणगिणी : आमच्या गावात होणार्‍या प्रशिक्षणवर्गातील उपस्थिती वाढण्यासाठी मी प्रयत्न करीन. 
३. कु. आेंकार रवींद्र गुरव, वठारवाडी, पेंडखळे : आजचा दिवस घरी वायाच गेला असता; मात्र कार्यशाळेला आल्याने मला प्रशिक्षण प्रात्यक्षिके शिकायला मिळाली, तसेच राष्ट्र आणि धर्म यांविषयीची माहिती मिळून दिवस आनंदात गेला.
४. कु. युवराज तुकाराम तांबे, तांबेवाडी, भू : आजच्या कार्यशाळेत शिकवलेले लवकरात लवकर आत्मसात करून मी दुसर्‍या वाडीत अथवा दुसर्‍या गावांत जाऊन प्रशिक्षणवर्ग घेईन.
५. कु. महेंद्र गजानन मेस्त्री, निनावेवाडी, पेंडखळे : आजच्या कार्यशाळेचा मला उत्तम लाभ झाला असून मी अन्य ठिकाणी प्रशिक्षणवर्ग घेईन.
६. कु. सौरभ महादेव सुर्वे, कु. तेजस शांताराम लांजेकर, पेंडखळे : आजचा वर्गात शिकवल्यानुसार मी अन्य मुलांचा प्रशिक्षणवर्ग घेईन.
७. कु. केतन दिनेश सुर्वे, वठारवाडी, पेंडखळे : मी अन्य गावात जाऊन प्रशिक्षणवर्ग चालू करण्यासाठी प्रयत्न करीन.
८. कु. प्रियांका पांडुरंग लोळगे, ओणी : हे प्रशिक्षण सर्व युवती आणि महिला यांनी घेणे अत्यावश्यक आहे. हे वर्ग चालू करण्यासाठी, तसेच जास्तीतजास्त विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण घेता यावे, यासाठी प्रयत्न करीन.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn