Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोल्हापूर जिल्ह्यातील ३ तालुक्यांत ३१ मार्चपर्यंत नवीन विद्युत् खांब बसवणार ! - ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे

      नागपूर, ९ डिसेंबर (वार्ता.) - कोल्हापूूर जिल्ह्यातील चंदगड, आजरा आणि गडहिंग्लज या तीन तालुक्यांतील गावांमधील डी.पी. आणि नवीन विद्युत् खांब बसवण्यासाठी १ कोटी ६० लक्ष रुपयांची तरतूद केली आहे. या तीन तालुक्यांत ३१ मार्चपर्यंत नवीन विद्युत् खांब बसवण्यात येतील, अशी माहिती ऊर्जामंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी ८ डिसेंबर या दिवशी विधानसभेतील प्रश्‍नोत्तरात दिली. चंदगड (जिल्हा कोल्हापूर) येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार श्रीमती संध्यादेवी कुपेकर यांनी हा प्रश्‍न विचारला होता. 
    श्री. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, चंदगड तालुक्यातील मौजे तुड्ये येथील बंद असलेले विद्युत् केंद्र (सबस्टेशन) चालू करण्याची मागणी करण्यात आली आहे. ३३ के.व्ही. तुडीये या वाहिनीवरील ३३ केव्ही ‘डिस्क इन्सुलेटर’ वारंवार निकामी होत आहे. स्थानिक ठेकेदाराकडून टप्प्याटप्याने ५०० ‘डिस्क इन्सुलेटर’ पालटूनही सदर वाहिनी कार्यान्वित न झाल्यामुळे संपूर्ण वाहिनीचे ‘डिस्क इन्सुलेटर’ पालटण्यात येणार आहेत. गडहिंग्लज विभागीय कार्यालयाच्या वतीने या कामाच्या निविदा प्रक्रियेचे काम प्रगतीपथावर आहे. लवकरच कामाला प्रारंभ करण्यात येईल.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn