Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

तमिळनाडूतील मशिदीमध्ये चालू असलेले शरीया न्यायालय बंद करण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश !

या देशात जोपर्यंत समान नागरी कायदा लागू होत नाही,
तोपर्यंत न्यायालयांना अशा प्रकारे आदेश द्यावे लागणार आहेत !
     चेन्नई - चेन्नईमधील अन्ना सलाईमध्ये मशिदीच्या आवारात मक्का मस्जिद परिषदेकडून शरीया न्यायालय स्थापन करण्यात आले होते. या न्यायालयात वैवाहिक प्रकरणांपासून ते समन्स बजावणे, घटस्फोटाचा निर्णय संमत करणे, असे निर्णय घेतले जात होते. याविरोधात अब्दुल रेहमान या अनिवासी भारतियाने मद्रास उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. रेहमान यांना शरीया न्यायालयाने पत्नीशी बळजोरीने घटस्फोट घ्यायला भाग पाडले होते. या याचिकेवर निकाल देतांना न्यायालयाने शरीया न्यायालय बंद करण्याचा आदेश दिला. धार्मिक स्थळ हे धार्मिक कार्यांसाठी वापरले पाहिजे, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. या प्रकरणात राज्य सरकारने मशिदींमध्ये शरीया न्यायालय चालणार नाही, याची खातरजमा करावी आणि ४ आठवड्यांत अहवाल सादर करावा, असे न्यायालयाने सांगितले.
     रेहमान यांचे अधिवक्ता ए. सिराजुद्दीन यांनी तमिळनाडूतील शरीया न्यायालयाच्या निकालामुळे असंख्य मुसलमानांची फरफट झाली, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. शरीया न्यायालय हे शरीया कायद्याप्रमाणे चालतात आणि त्याने दिलेले सर्व निर्णय हे मुसलमानांसाठी बंधनकारक असते, असे चित्र या न्यायालयामुळे निर्माण झाले, असे सिराजुद्दीन यांनी न्यायालयात सांगितले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn