Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

चोपडा (जिल्हा जळगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नामदिंडी

  
   चोपडा -
दत्तजयंतीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रतीवर्षीप्रमाणे नामदिंडी काढण्यात आली. शहरातील छत्रपती शिवाजी चौकात सकाळी ८.३० वाजता नगरसेवक जीवन चौधरी यांनी सपत्नीक नगराध्यक्ष मनीषा चौधरी यांसह प्रभू दत्त भगवानच्या छायाचित्राचे पूजन आणि माल्यार्पण केले, तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. धर्मध्वज हातात घेऊन छत्रपती शिवाजी चौकातून नामदिंडीला प्रारंभ झाला. जुने दत्त मंदिराच्या ठिकाणी दिंडीची सांगता करण्यात आली. या वेळी सर्वांनी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ असा सामूहिक जप केला. नामदिंडीला समितीचे कार्यकर्ते, नवग्रह समितीचे सुनील सोनगीरे, अनिता माळी यांसह मोठ्या संख्येने हिंदू धर्माभिमानी उपस्थित होते.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn