Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या महामृत्यूयोगाच्या निवारणार्थ रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात मृत्यूंजय याग संपन्न !

यज्ञस्थळी देवतांना ओवाळतांना 
सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि बाजूला 
सनातन साधक पुरोहित पाठशाळेचे पुरोहित
    रामनाथी, गोवा - गेल्या काही दिवसांपासून परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्यावरील महामृत्यूयोगाचे संकट टळून त्यांना दीर्घायुष्य लाभावे, यासाठी महर्षींनी जीवनाडीच्या माध्यमातून केलेल्या मार्गदर्शनानुसार रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात मृत्यूंजय याग करण्यात आला.
क्षणचित्रे 
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील संकट दोन पक्षांनी स्वतःवर घेणे : १०.१२.२०१६ या दिवशी यज्ञाची पूर्वसिद्धता चालू असतांना आश्रम परिसरात असलेल्या पारिजातकाच्या झाडाजवळ दोन पक्षी पडतांना दिसले. त्यातील एक पक्षी मृतावस्थेत होता आणि एक घायाळ अवस्थेत होता. तो काही वेळाने उडून गेला. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील संकट पशूपक्षी स्वतःवर घेतात, असे सप्तर्षि जीवनाडीच्या माध्यमातून महर्षींनी सांगितले आहे. त्याचीच ही साक्ष होती.
२. ११.१२.२०१६ या दिवशी यागाचे हवन चालू असतांना महर्षींच्या प्रतिमेवरील पुष्पहार उजव्या बाजूने पडला, तर दुसर्‍या दिवशी डाव्या बाजूने पडला. यावरून यागाची सेवा भावपूर्ण आणि परिपूर्ण होत आहे, याची महर्षींनी साक्ष दिली. 
३. पहिल्या दिवशी म्हणजे ११.१२.२०१६ या दिवशी यागाला प्रारंभ झाल्यावर एक गरुड पूर्वेकडून पश्‍चिमेकडे जातांना दिसला आणि याग संपल्यानंतर पुन्हा पश्‍चिमकडून पूर्वेकडे जातांना दिसला, तसेच दुसर्‍या आणि तिसर्‍या दिवशीही याग चालू असतांना गरुडाचे दर्शन झाले.
सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना आलेल्या अनुभूती 
१. यागाच्या वेळी शिवतांडव स्तोत्र वाचत असतांना 
भगवान शिव तांडव नृत्य करत असल्याचे दृश्य दिसणे
     यागाच्या वेळी शिवतांडव स्तोत्र वाचत असतांना व्याघ्रांबर घातलेला भगवान् शिव तांडव नृत्य करत असल्याचे दृश्य दिसले, तसेच शिव वाजवत असलेल्या डमरूचा नाद संपूर्ण ब्रह्मांडात घुमत असल्याचे जाणवले. 
२. याग चालू असतांना येणार्‍या आपत्काळाचे संकेत जाणवणे
    याग चालू असतांना खवळलेला समुद्र, सोसाट्याचा वारा, वादळाचे थैमान इत्यादी दृश्ये दिसून पंचमहाभूतांनी रौद्ररूप धारण केल्याचे जाणवत होते. ही दृश्ये म्हणजे येणार्‍या आपत्काळाचे संकेत आहेत, असे जाणवले. 
३. हवन चालू असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी नमस्कार केल्यावर शिवाच्या 
प्रतिमेवरील कमलपुष्प खाली पडणे, हे त्यांच्यातील विष्णुतत्त्वाची साक्ष होती, असे जाणवणे
      १२.१२.२०१६ या दिवशी यागाचे हवन चालू असतांना परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी नमस्कार केला. त्या वेळी शिवाच्या प्रतिमेला वाहिलेले कमलपुष्प खाली पडले. यावरून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील विष्णुतत्त्वाची ती साक्ष होती, असे जाणवले.
४. यागाच्या वेळी शिवाचे अस्तित्व जाणवणे
     यागाच्या तिसर्‍या दिवशी म्हणजे १३.१२.२०१६ या दिवशी आश्रम परिसरात कैलास पर्वताप्रमाणे वातावरण निर्माण होऊन शिवाचे अस्तित्व जाणवत होते. यागाचा संपूर्ण वेळ ध्यानावस्था अनुभवली. 
- (सद्गुरु) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn