Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

स्वामी श्रद्धानंद स्थापित गुरुकुल : राष्ट्रभक्त निर्मितीचे केंद्र !

     ‘स्वामी दयानंद सरस्वती यांची ओजस्वी वाणी, तेजस्वी रूप आणि तत्त्वज्ञान यांमुळे ते प्रभावित झालेे. स्वामी दयानंदांच्या उपदेशामुळे अनेक दुर्व्यसनांनी ग्रस्त मुन्शीराम यांच्या जीवनात आमुलाग्र पालट घडला आणि ते राष्ट्रपुरुष बनले. स्वामी श्रद्धानंदांनी दयानंद सरस्वती यांच्या शिक्षणविषयक दृष्टीकोनांना साकार करण्याचे व्रत घेतले. त्यांनी गुरुकुल शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून नवीन पिढी घडवण्यासाठी आदर्श गुुरुकुलाची स्थापना केली. त्यासाठी त्यांनी लाहोर, रावळपिंडी, जालंधर, अंबाला, सहारनपूर, हरिद्वार, रूडकी, देहली आणि ग्वाल्हेर येथे भ्रमण करून दान गोळा केले.      वैदिक धर्माचा प्रचार करतांना त्यांनी गुरुकुलासाठी योग्य जागेचा शोधही घेतला. बिजनौर येथील चौधरी अमनसिंह यांनी त्यासाठी कांगडी गावात गुरुकुलासाठी जागा दान दिली, तर एक वर्षापेक्षा कमी काळात त्यांच्याकडे ४० सहस्र रुपये जमा झाले. त्यानंतर कांगडी येथे गुरुकुलाला आरंभ झाला. या गुरुकुलाची दिनचर्या सुनिश्‍चित होती. गुरुकुलातील सर्व पाठ्यविधी ऋषीपद्धतींवर आधारित होते. त्याचबरोबर ज्ञान, विज्ञान, तंत्र आणि व्यवसाय यांचेही शिक्षण त्यात अंतर्भूत होते.
     हे गुरुकुल म्हणजे एक राष्ट्रीय संस्था होती. भारताच्या स्वातंत्र्याची मागणी करणारे राष्ट्रभक्त तेथे निर्माण केले जात होते. त्यामुळे ब्रिटीश सरकारकडे गुरुकुलाचा भ्रामक आणि संदिग्ध अहवाल तत्कालीन पोलीस संस्थांनी धाडला होता. वर्ष १९१४ मध्ये हिवाळ्यात इंग्लंडचे तत्कालीन पंतप्रधान रेम्जे मैक्डोनल्ड भारतात आले. मैक्डोनल्ड हे स्वामी श्रद्धानंदांच्या कार्याने प्रभावित झाले. पोलीस अधिकार्‍याचा अहवाल त्यांच्या दृष्टीने खोटा ठरला. मैक्डोनल्ड यांनी लिहिले आहे, ‘‘ज्यांनी भारतीय राजविद्रोहाचा अभ्यास केला आहे, त्यांनी कांगडी गुरुकुलामध्ये आर्य विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या शिक्षणाविषयी ऐकले असेलच. हे गुरुकुल म्हणजे आर्यांची वृत्ती आणि आदर्श यांचे प्रतिबिंब आहे. येथे युवा पिढीला वैदिक सिद्धांंतांनुसार वागण्याची प्रेरणा दिली जाते.’’
      स्वामी श्रद्धानंदांच्या या गुरुकुलाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना सनातन सूक्त कोरलेली होती आणि तेथे ध्वजा फडकत असेे. या गुरुकुलात ६ ते १० वर्षे या वयात असतांनाच प्रवेश दिला जात आणि २५ वर्षांपर्यंत तेथे रहावे लागे. पहाटे ४ वाजता उठून व्यायाम, शौच इ. सर्व आटपावेे लागेे. त्यानंतर प्रातःसंध्या होत असे. येथील सर्व विद्यार्थी अनवाणी पायांनी का चालत जातात, असे ब्रिटीश पंतप्रधानांनी स्वामी श्रद्धानंद यांना विचारले. त्यावर स्वामी म्हणाले, ‘‘योगायोगाने कधी कठोर जीवन जगावे लागले, तर याचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो.’’
     भारतीय स्वातंत्र्यसंग्राम, शुद्धी आंदोलन, हिंदु जागृती, पाखंडखंडन, हिंदी प्रचार, समाज संघटन आदी क्षेत्रांत त्यांनी केलेल्या कार्यामुळे स्वामी श्रद्धानंद आदर्श पुरुष ठरले. अशा वीर पुरुषाला विनम्र श्रद्धांंजली !’
(संकलन : सौ. जयश्री जगन्नाथ परांजपे, ओरोस, सिंधुदुर्ग.)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn