Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

श्री दत्तात्रेयांचे प्रमुख अवतार आणि त्यांच्याविषयीचे विवेचन

     श्रीपाद श्रीवल्लभ हा दत्ताचा पहिला अवतार. यांनी पंधराव्या शतकात महाराष्ट्रात दत्तोपासना चालू केली. श्री नृसिंह सरस्वती हा दुसरा अवतार. श्री गुरुचरित्रात श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती या दोन्ही अवतारांचे विवेचन केले आहे. 
काही प्रमुख संत : एकनाथ, माणिकप्रभु, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, वासुदेवानंद सरस्वती, पंतमहाराज बाळेकुंद्रीकर इत्यादी. (बाळेकुंद्री हे गाव बेळगावच्या जवळ आहे.)
अवतार : ऐतिहासिक काळात श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, माणिकप्रभु हे तीन आणि चौथे श्री स्वामी समर्थ महाराज अवतार होत. हे चार पूर्ण अवतार आणि अंशात्मक अवतार तर कितीतरी आहेत. यात श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबेस्वामी) यांचा समावेश आहे. 
    लोकांचा त्रास चुकवण्यासाठी श्री नृसिंह सरस्वती आपल्या शिष्यांना सांगून कर्दलीवनात गेले. तेथे तपश्‍चर्या करत असतांना त्यांच्या अंगावर मुंग्यांनी वारूळ केले आणि त्यांचे पूर्ण अंग झाकून गेले. कित्येक वर्षांनी एक लाकूडतोड्या त्या वनात लाकडे तोडत असतांना त्याच्या कुर्‍हाडीचा निसटता वार त्या वारुळावर बसला. कुर्‍हाडीच्या पात्याला रक्त लागलेले पाहून तो घाबरला आणि त्याने वारूळ उकरले.
त्यातून नृसिंह सरस्वती हे अक्कलकोटस्वामी म्हणून बाहेर पडले. स्वामींचे वास्तव्य अक्कलकोट येथील सध्याच्या मठात औदुंबराखाली असे. या संप्रदायातील काही प्रमुख अवतारांची माहिती पुढील सारणीत दिली आहे.


टीप १ - ८ व्या वर्षी मुंज झाल्यावर चारही वेद म्हणायला लागला. १६ व्या वर्षी धर्मप्रचारासाठी घराचा त्याग केला. 
टीप २ - जन्मतः ॐकार नाद केला. ८ व्या वर्षापर्यंत मुका होता; पण आई-वडिलांना चमत्कार करून दाखवायचा.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn