Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

शरीयतमध्ये पालट करता येईल का ?, या न्यायालयाच्या प्रश्‍नाला नरेंद्र मोदी यांनी हो म्हणावे ! - शिवसेना

     मुंबई - तोंडी तलाक घटनाबाह्य आणि निर्घृण असल्याची भूमिका घेऊन अलाहाबाद उच्च न्यायालयाने समान नागरी कायद्याचा मार्गच उघडा करून दिला आहे. म्हणूनच शरीयतमध्ये पालट करता येईल काय ? या न्यायालयाच्या प्रश्‍नाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुणाचाही सल्ला न घेता होय म्हणावे. अलाहाबाद उच्च न्यायालयाची भूमिका हा निकाल नाही. ते त्याचे निरीक्षण आहे; पण हीच देशाची भावना आहे आणि मुसलमान महिलांच्या वेदनेचा स्फोट आहे. देशाची भावना समजून होय म्हणा. तो निर्णयही नोटाबंदीइतकाच देशभक्तीचा आणि क्रांतीकारक ठरेल, अशी सामनाच्या अग्रलेखातून श्री. उद्धव ठाकरे यांनी शरीयत कायद्याविरोधात परखड भूमिका मांडली आहे. यात पुढे म्हटले आहे की, पंतप्रधानांच्या होयनंतर जे मुल्लामौल्लवी हैदोस घालायला रस्त्यावर उतरतील, ते देशद्रोही आणि जे घरात बसून रहातील ते देशभक्त हे आताच घोषित केले, तर अधिक बरे होईल.
यात पुढे म्हटले आहे - १. नोटाबंदीस विरोध करणार्‍यांना ज्याप्रमाणे देशद्रोही ठरवण्यात आले, तसे मुस्लिम पर्सनल लॉच्या नावाखाली महिलांचा छळ करणार्‍यांना देशद्रोही ठरवून त्यांना शिक्षा ठोठवायला हवी.
२. तलाक या केवळ ३ शब्दांनी एका स्त्रीचे आयुष्य क्षणात उकिरड्यावर येत असेल, तर ही प्रथा धार्मिक नसून अघोरी आहे.
३. मुसलमान महिलांच्या यातनांविषयी आवाज उठवणे म्हणजे इस्लाम खतरे में असे ज्यांना वाटते, ते देशद्रोही आहेत; पण यावर एकही नोटाबंदी समर्थक उघडपणे बोलायला सिद्ध नाही. कारण उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत मुसलमानांच्या मतपेढीवर भाजपसह सगळ्यांचाच डोळा आहे.
४. काँग्रेसचे सरकार शरीयतच्या बाजूने झुकले आणि शाहबानो प्रकरणात घटनादुरुस्ती करून सर्वोच्च न्यायालयाचा पराभव केला. शाहबानोचा आक्रोश आणि न्यायाची मागणी गाडली गेली. आताही तसेच घडणार असेल, तर अलाहाबाद न्यायालयाच्या सद्सद्द्विवेकबुद्धीच्या हातोड्यास अर्थ नाही.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn