Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

पुणे येथे ‘लेफ्ट-राईट-लेफ्ट’ नाटकाच्या वेळी डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांकडून गोंधळ घालण्याचा प्रयत्न

नाटकातून शहरी भागातील 
वाढत्या नक्षलवादावर प्रकाश !
       पुणे, २० डिसेंबर - शहरी भागात वाढत जाणार्‍या नक्षलवादावर प्रकाश टाकणारे ‘लेफ्ट-राईट-लेफ्ट’ हे नाटक रंगभूमीवर आले आहे. हे नाटक ‘आर्ट ऑफ नेशन’ आणि अभाविप यांच्या वतीने ‘जागर कलामंच’ यांनी प्रस्तूत केले आहे. या नाटकातून नक्षलवादाविषयीची कटू सत्ये मांडण्यात आल्याने साम्यवादी (कम्युनिस्ट), तसेच डाव्या विचारधारेच्या लोकांना ते जिव्हारी लागत असल्याचे चित्र दिसत आहे. (डाव्या विचारसरणीच्या वाढत्या नक्षलवादाविषयीचे वास्तव नाटकाद्वारे मांडणार्‍या अभाविपचे अभिनंदन ! - संपादक) ८ डिसेंबर या दिवशी नाटकाच्या पहिल्याच प्रयोगाच्या वेळी डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात अभाविपच्या कार्यकर्त्यांना विरोध केला आणि त्या विद्यार्थ्यांनी गोंधळ घालून नाटक बंद पाडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. (डाव्यांचा सत्य मांडणार्‍यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न ! डाव्या विचारसरणींच्या विद्यार्थ्यांकडून केला जाणारा विरोध हा एकप्रकारे त्यांची कुकृत्ये उघड करतोे. - संपादक) नाटकाच्या प्रयोगानंतर प्रश्‍नोत्तरासाठी वेळ दिलेला असूनही डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांनी हमरातुमरीवर येऊन गोंधळ घातला. (अशा प्रकारे गोंधळ घालून विरोध करणार्‍या डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी कारवाई करणे अपेक्षित आहे. - संपादक)
       याविषयी अभाविपचे पुणे महानगरमंत्री प्रदीप गावडे म्हणाले, ‘‘ज्या वेळी डाव्या विचारसरणीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जाते, तेव्हा डावी विचारसरणी असलेल्या देशांमधील दारिद्य्र, तेथे होणारी मानवी अधिकारांची पायमल्ली, नक्षलवाद्यांकडून होणारे आदिवासींचे शोषण यांविषयी प्रकाश टाकला जातो, तेव्हा डाव्या विचारसरणीच्या लोकांकडून कार्यक्रमामध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला जातो. असे असले, तरी विरोधाला न जुमानता आगामी काळातही नक्षलवादाविषयीचे सत्य मांडणारे कार्यक्रम आयोजित केले जातील.’’
नाटकात दाखवलेली काही महत्त्वाची दृश्ये -
१. ‘या देशात माओवाद्यांचे राज्य आणायचे आहे, भले देशाचे तुकडे झाले तरी चालतील आणि ‘बंदूक के दम पे आजादी चाहिये’, असे एक कॉम्रेड म्हणतात. ‘लाल सुबह को लाना, यह भगतसिंह का सपना है ।’, असेही ते सांगतात. (हुतात्मा भगतसिंह यांच्या नावाचा अपवापर करणारी डावी विचारसरणी !- संपादक)
२. ‘क्रांती म्हणजे आगीशी खेळ आहे. यामध्ये ओल्यासमवेत सुके जळणारच आहे’, असे एक कॉम्रेड दुसर्‍या कॉम्रेडला समजावतो.
३. केरळमध्ये पुन्हा माओवाद्यांची सत्ता आली आहे. त्यामुळे पुन्हा संघ स्वयंसेवकांच्या हत्या होणार आणि पत्रकार अन् लेखक मात्र ‘ब्र’ही काढणार नाहीत कि ‘अवॉर्ड’वापसी करणार नाहीत.
४. ‘सर्वात जास्त जातीयवाद हा पश्‍चिम बंगाल मध्येच आहे आणि त्याचे प्रतीक म्हणजे मातीचं कुल्हड आहे’, असे एक जण कॉम्रेडला म्हणतो.
५. ‘कलबुर्गी यांची हत्या का झाली ?’, असा एक प्रश्‍न कॉम्रेड उपस्थित करतो, तेव्हा त्यांच्यातीलच एक कॉम्रेड पत्रकार नशेमध्ये सांगतो की, कलबुर्गींनी लिंगायत समाजाची माफी मागितली होती. कारण त्यांनी ‘शिवपिंडीवर लघुशंका करतो, तरी मला काही होणार नाही’, असे म्हटले होते. यावर प्रश्‍न विचारणारा कॉम्रेड त्याला थांबवतो आणि त्याला थोबाडीत मारतो.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn