Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

अनैतिक वर्तन करण्याविषयी विचारणा करणार्‍या अरबिंदो आश्रमाची देखरेख करणार्‍या कुटुंबाला पोलिसांकडून मारहाण !

जनतेचे रक्षक नव्हे, तर गुंडांप्रमाणे वर्तन करणारे पोलीस !
     नागपूर - अरबिंदो आश्रमात मद्यपान करण्यास बंदी केल्याच्या कारणावरून ‘मॉरिस टी पॉईंट’च्या सुरक्षेसाठी नेमलेल्या पोलिसांनी आश्रमाची देखरेख करणार्‍या मुरेकर कुटुंबाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. अधिवेशनाच्या काळात पोलिसांनी या आश्रमाच्या परिसरात मद्यपान केले, तसेच कचरा केला होता, यासंबंधी देखरेख करणार्‍या कुटुंबाने त्यांना जाब विचारला होता. (‘मारहाण करणारे असे व्यसनी पोलीस जनतेचे रक्षक नव्हे, भक्षकच आहेत. शासनाने अशा पोलिसांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी जनतेची अपेक्षा आहे !’ - संपादक)
     विधानभवनापासून अर्धा कि.मी. अंतरावर हा आश्रम असून येते बरेचदा मोर्चे येऊन थांबतात. त्यासाठी येथे मोठ्या प्रमाणात येणारे पोलीस जवळच असणार्‍या या आश्रमाच्या शांत वातावरणात येऊन थांबतात. या वर्षी बंदोबस्ताला आलेल्या पोलिसांनी आश्रमाच्या सर्व मर्यादा ओलांडत आश्रमाच्या परिसरात जेवण करून खरकटे टाकणे, घाण करणे, मद्यपान करणे असे अपप्रकार केले.
     ‘‘एका आध्यात्मिक आश्रमात असे कृत्य का करता ?’’ असा प्रश्‍न मुरेकर कुटुंबियांनी विचारताच हे पोलीस चिडले आणि चंद्रकांत मुरेकर यांना मारहाण करून पोलीस ठाण्यात स्थानकात नेण्याचा प्रयत्न केला. या वेळी आजूबाजूच्या लोकांनी विरोध केल्याने पोलिसांनी त्यांना सोडून दिले. दोषी पोलिसांच्या विरोधात तक्रार करण्यात आली आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn